नायगरा फॉल चे केले वैशाली नावाने नामकरण पांजरे

- Advertisement -
- Advertisement -

अकोले-प्रतिनिधी

 

नायगरा फॉल यास  ‘ वैशाली ‘ धबधबा म्हणून त्या धबधब्याचे नामकरणच केले यावेळी पांजरे गावातील संपूर्ण गावकरी ,पर्यटक उपस्थित होते.

स्त्री  भ्रूणहत्या राज्यात होत असल्या तरी आदिवासी भागात मुलीला लक्ष्मीचे रूप मानले जाते.अपंग असलेल्या वैशाली हीचे वडील लक्ष्मण उघडे यांनी तर चक्क आपल्या शेतात अवतरलेल्या धबधब्याचे नामकरणच केले.

सध्या वनविभागाने भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील धब धब्याना नावे देण्यासाठी मोठा खर्च केला आहे .मात्र योग्य नावे त्यांना अजूनही सापडले नाही .कुणीतरी सांगितलेल्या नावावर धबधब्याच्या नावाचा बोर्ड बनवून नाव लावले जात आहे .

हा भाग क्रांती वीर राघोजी भांगरे,रामजी खाडे यांचा पराक्रमाच्या पाऊलखुणा सांगणाऱ्या आहेत .त्यांना मानणारा आदिवासी समाज येथे राहतो , मात्र त्यांच्या नावाने निसर्गाचे स्मारक असावे अशी अनेकांची अपेक्षा आहे.

 

येसर ठाव जलाशय भरल्याने तालुक्यातील सात जलाशय तुडुंब 

लक्ष्मण सयाजी उघडे हे पांजरे गावचे पोलिस पाटील त्यांची मोठी शेती आहे .मात्र डोंगर दर्यातील सर्व पाणी त्यांच्या शेतात येऊन तिथे मोठा फॉल तयार झाला. जणू नायगर फॉल ची प्रतिकृती म्हंटले तर वावगे ठरणार नाही.त्यांनी मग आपल्या लाडक्या लेकीचे की जी लेक जन्मतःच अपंग आहे .तिच्या नावाने या फॉलचे नामकरण करून वैशाली नावाने तिच्या विषयी आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या.

यावेळी नऊ गावातील ग्रामस्थ,पर्यटक उपस्थित होते.यावेळी सोमनाथ उघडे यांनी या धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल.

धबधबा

 

हा धबधबा कुणालाच माहीत नव्हता मात्र त्याचे दर्शन लक्ष्मण उघडे यांनी त्यांच्या लाडक्या लेकीच्या प्रेमातून झाले आहे.

पांजरे गावच्या अगदी दहा पाऊलावर हा धबधबा कोसळत आहे.तर चला या धबधबा पाहण्यासाठी

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles