नगर पुणे महामार्गावर अपघातात आव्हाणे गावातील 5 ठार
शिरूर
नगरहून पनवेल कडे जात असताना रांजणगाव एमआयडीसी परिसरात इको गाडी आणि कंटेनरच्या अपघातात 5 जण जागीच ठार झाले.तर एक महिला गंभीर जखमी झाली.जखमींवर शिरूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आव्हाणे बुद्रुक येथील म्हस्के कुटुंबीय गावाकडे मुलीच्या लग्नासाठी आले होते.
लग्न समारंभ दोन दिवसांपूर्वी संपन्न झाला होता. त्यानंतर कुटुंबातील काही मुले हे आपल्या नातेवाईक आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे गेले होते.मात्र संजय भाऊसाहेब म्हस्के वय 55 आणि राम भाऊसाहेब म्हस्के वय 35 हे दोघे भाऊ आव्हाणे गावी होते.ते रात्री आपली स्कुल बस व्हॅन घेऊन सावरगाव येथे गेले .तेथून विशाल संजय म्हस्के,वय 15 राजवीर राम म्हस्के वय 5 वर्षे,हर्षदा राम म्हस्के वय 3 वर्षे,आणि साधना राम म्हस्के वय 25 यांना घेऊन पनवेल येथे निघाले होते.सध्या हे कुटुंब पनवेल येथे कामानिमित्त राहत होते.दोन दिवसांपूर्वी संजय यांच्या मुलीचा विवाह आव्हाणे येथे पार पडला होता.
आव्हाणे गावावर शोककळा
मृत सर्व हे मूळचे आव्हाणे येथील रहिवासी होते. त्याच गावात त्यांचे घर आहे.ही घटना गावात कळताच गावकऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. गावात दुःखाचे सावट असून त्यांचा अंत्यविधी सायंकाळी होणार आहेत.
नगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना रांजणगाव येथे चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेला ट्रक अचानक रोडच्या मधोमध आल्याने स्कुल व्हॅन आणि ट्रकची जोरदार धडक झाली. त्यामध्ये, व्हॅन मधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.साधना ही महिला गंभीर जखमी झाली.
रांजणगाव एमआयडीसीतील LG कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या सहाय्याने वाहनं हटविण्यात आली आहेत.