राजकारणात गोपीनाथांचा आशीर्वाद-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -

राजकारणात गोपीनाथांचा आशीर्वाद -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गहिनीनाथ गड

नाथांचा आशिर्वाद घेण्यासाठी गहिनीनाथ  गडावर आलो. गडावरील विकासाचा आराखडा पूर्ण केला जाईल तसेच समुद्राला वाहून जाणारे हक्काचे पाणी वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला दिले जाईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .

बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजीत संत वामनभाऊ महाराज यांच्या 47 व्या पुण्यतिथी सोहळयात ते बोलतं होतें..
माझ्या राजकारणात गोपीनाथांचां आशीर्वाद मिळाला असे म्हणतं देवेंद्र फडणवीस यांनी भगीरथ प्रयत्नासाठी संत वामनभाऊंनी आशीर्वाद द्यावा अशी मागणीहि केली.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे, विधान परिषद सदस्य सुरेश धस ,आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर  उपस्थित होते.तर मुंडे कुटंबाची इथे अनुपस्थिती जाणवली.

गहिनीनाथ गडावरील भगवा ध्वज हा नुसता ध्वज नसून जबाबदारी आहे . ती समर्थ पने पेलणार आहे. इथे आल्यानंतर मराठवाड्याची पंढरी पहायला मिळाली.. मुंबईवरून हेलिकॉप्टरने येताना अरबी समुद्र पाहिला आणि इथं आल्यानंतर गहीनाथ गडावरील भक्तीचा समुद्र पाहायला मिळाला.

 

देवेंद्र फडणवीस गर्दी
देवेंद्र फडणवीस गर्दी

देवाच्या मनात असेल तर तो दर्शनासाठी बोलावतो आज वामन भाऊंनी बोलावले म्हणून मी इथे आलो.. नाथ आणि वारकरी संप्रदायाचे मूळ या पवित्र स्थानावर आहे.देश देव आणि धर्म वारकरी संप्रदायामुळेच वाचला.. संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचे काम वारकरी संप्रदायाने केले..

आद्य ठिकाण असलेल्या गहिनीनाथ गडाचा विकास आराखडा लवकरच पूर्ण केला जाईल असा शब्द देवेंद्र फडणविस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा मिनिटाच्या भाषणामध्ये ओझरता माजी पालकमंत्री पंकजा मुंडे असां उल्लेख केला..

विशेष म्हणजे गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमास पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांची अनुपस्थिती होती.. प्रत्येक वर्षी न चुकता पुण्यतिथी उत्सवाला पंकजा मुंडे उपस्थित असतात मात्र यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना आजारी असल्याचे कारण काढून पंकजा मुंडे यांनी दांडी मारली..

 

यामुळें राजकिय वर्तुळात चर्चा होत आहे..

बीड सह महाराष्ट्राच्या राजकारणात परिणामकारक समजला जाणाऱ्या भगवानगड या लाखो भाई भक्तांच्या श्रद्धास्थानावरील कार्यक्रमाला पंकजा मुंडें यांनी पाठ फिरवणे यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles