परतनदरावाडी सत्तर वर्षे उलटूनही पाण्याची वाट पाहत आहे.*

राजूर

एकविसाव्या शतकाकडे प्रवास करताना एका गावाची व्यथा ऐकल्यावर तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही

वाडीत जायला रस्ता नाही..प्यायला पाणी ? तेही नाही.  वीज कधी येते कधीही जाते रहिवासी अनामिक दहशतीखाली परतनदरावाडी ची ही करुण कहाणी रोजचे जगणे अवघड करणाऱ्या अडचणीमुळे काही कुटुंबे शेतीवाडी सोडून स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत .तालुक्यातील सत्तर वर्षे उलटूनही  ही वाडी पिण्याच्या पाण्याची वाटakl22p4 akl22p1 akl22p3 akl22p2 पाहत आहे.

तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीत तेथून तीन किलोमीटरवर परतनदरावाडी आहे.पंचवीस घराच्या वाडीत सव्वाशे दिडशे लोक राहतात या ठाकर वस्तीवर विकासाची  पहाट अद्याप उगवायची आहे ,रस्ता नसल्याने वाडीला कोणतेही वाहन जात नाही पाऊलवाटेने जावे लागते  त्यात रस्ता अडविला जातो वाडीतील समस्या समजल्यानंतर . तनिष्का व्यासपीठ सदस्या शकुंतला खरात यांनी  हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले मात्र आपल्या अडचणी सांगण्यासाठी पुढे कुणी येण्यास तयार नव्हते मात्र त्यांना विश्वास दिल्याने काही महिला व तरुण यांनी दबक्या आवाजात  दादा आम्हाला ना रस्ता,ना पाणी ना स्वस्थ धान्य ना आदिवासी विकासाच्या योजना काटे कुटे तुडवीत  तीन किलोमीटर वर कळंब गावात जावे लागते .अजून टँकर सुरू झाला नाही .तर विहिरींना पाणी नाही खडकाळ माळरानावर कसे तरी दिस काढतो . सध्या कोरोना महामारी आल्याने ना रोजगार ना खावटी,जंगलातील कवदर  खाण्या शिवाय   पर्याय नाही. २०१४ ला शासनस्तरावर पाठपुरावा केला मात्र अधिकारी वर्गाने कागदी घोडे नाचवून हा प्रश्न लाल फितीच्या कारभारमुळे तसाच दाबून ठेवला .

ग्रामपंचायतीच्या तेथून ३ किलोमीटरवर पसनदी आहे

कळंबसह परतनदरावाडी ला चार वर्षांपूर्वी नळयोजना केली होती. ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली. तिथी आजची परिस्थिती सांगता येणार नाही। – वसंतराव डोंगरे, उपअभियंता (लघुपाटबंधारे विभाग)

महिलांना तासन् तास थांबून झऱ्यावरून तांब्याने पाणी भरावे लागते.

रात्री पाणी भरायचे, दिवसा मजुरी…

सध्या वाडीतील लोक ब्राह्मणवाडा आणि पिंपळदरी येथे मजुरीला जातात. कोणत्याही दिशेला जायचे, तर डोंगर तुडवावे लागतात. रात्रभर पाणी भरायचे आणि दिवसा मजुरीला जायचे, एवढेच रहिवाशांना माहीत. घरी कोणी नसल्यामुळे मुले कधीतरीच शाळेत जातात. वाडीसाठी अंगणवाडी बांधली; ती दूर असल्याने मुले जातच नाहीत. गावात सायंकाळी वीज येते आणि पहाटे जाते. बिबटे आणि तरस यांचा वावर नेहमीचाच. शेळ्या व इतर जनावरे घरात किंवा पडवीत बांधून त्यांच्याजवळच झोपावे लागते

परतनदरावाडी बचतगटही बंद झाला

आशाबाई खंडे, भोराबाई खंडे, सुरेखा खंडे, कौशाबाई खंडे आदी ११ महिलांनी बचतगट सुरू केला; तोही बंद झाला. आदिवासी विकास विभाग दर वर्षी भाऊबीज अनुदान म्हणून महिला बचतगटाला १० हजार रुपये देतो. इथल्या महिलांपर्यंत ही योजना पोचलीच नाही. वाडीत शासनाचा व आदिवासी विकास विभागाचा एक पैसाही आजवर आला नाही. पंचायत समितीचे अधिकारीही कधी फिरकले नाहीत.

obc scholarship,मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 293 कोटी मंजूर

परतनदरावाडी ला लवकरच भेट देऊन प्रश्न समजून घेऊन ते तातडीने सोडवू.

-संतोष ठुबे (आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी)

२०१० ला वाडी साठी नळयोजना केली मात्र ती सुरू होण्यापूर्वी पाणीणीयोजना बंद आहे. रोजगार हमोतून रस्ता केला; तो फुटला आहे. श्रीमती शकुंतला खरात (उपसरपंच कळंब)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles