चंद्रपूर न्यूज
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पत मोठी घटना घडली असून व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षक वर वाघाचा हल्ला केल्याची घटना आज घडली.
व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षक स्वाती ढुमणे या ठार झाल्या आहेत. त्यांचे वय ४३ वर्षे आहे.
ही घटना ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 मध्ये घडली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्रगणना
महिला वनरक्षक स्वाती ढुमणे या वन मजुरांसह व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. सोबत असलेल्या 4 वनमजुरांनी वाघाला हुसकाविण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.
वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वन विभागाने केलेल्या शोधमोहिमेत त्यांचा मृतदेह सापडला.
सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे.
आणखी वाचा :Makhana in Marathi स्वादिष्ट मखाना खीर