किसान सभेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परळी तहसीलवर सोमवारी मोर्चा-कॉ.अजय बुरांडे

- Advertisement -
- Advertisement -

 

परळी वै.ता.६ प्रतिनिधी

२०२० चा पिकविमा, थकलेले अनुदान व अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता.७) परळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे कॉ अजय बुरांडे यांनी केले आहे.

सन 2020 चा खरीप व रब्बी पिकांचा पीकविमा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा. सन 2021 चा पिकविमा नुकसानीच्या प्रमाणात सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने जमा करा.

तसेच या विमा वितरणाच्या याद्या महसूल मंडळानुसार प्रकाशित करून कोणताही विमाधारक शेतकरी या पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. सन 2018 च्या पिक विम्या पासून वंचित सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा विमा वितरीत करा.

या वर्षीच्या अतिवृष्टी अनुदाचा पंचवीस टक्के रक्कमेचा राहिलेला दुसरा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. जिल्हातील अतिरिक्त ऊसाचे लवकरात लवकर गाळप करून शेतक-यांचे होणारे नुकसान कमी करावे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्या.

या मागण्यासाठी बीड जिल्हा किसान सभे च्या वतीने सोमवारी (ता.७) परळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे कॉ अजय बुरांडे, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ सुदाम शिंदे, कॉ. बालासाहेब कडभाने, कॉ परमेश्वर गीत्ते, कॉ. विशाल देशमुख, कॉ. रूस्तुम माने, कॉ पप्पु देशमुख आदींनी केली आहे.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन- मेट्रोचे पुणेकरांचे स्वप्न पूर्ण

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles