बीड
येथील सामाजिक कार्यकर्त्या उषा रुपदे यांची इनरव्हील क्लब बीड च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. दि. १७ जुलै रोजी पदग्रहण समारंभ सोहळा पार पडला.
अध्यक्ष पदी उषा रुपदे , उपाध्यक्ष अरुणा लड्डा, सचिव अर्चना झोडगे, कोषाध्यक्ष अनिता शिंदे, आय एस ओ पुष्पा कासट, एडिटर शोभा बडजाते, सी सी सी वैशाली नहार यांची २०२२- २०२३ करिता ही निवड करण्यात आली आहे. या पदग्रहण समारंभ सोहळ्याला पी डी चव्हाण (दिवाणी न्यायधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा बीड) योगिनी पाटील ( सिनेट सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागतगीत अर्चना झोडगे यांनी सादर केले. माजी अध्यक्ष पुजा जाजु यांनी मागील वर्षाचा कार्याचा आढावा त्यांनी दिला.न्यायाधीश पी डी चव्हाण यांनी आपल्या मनोगतात, इंनरव्हील क्लब च्या उपक्रमाचे भरभरून कौतुक करीत समाजातील गरजु लोकांना व सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात सहभाग असतो असे ते म्हणाले.
नुतन अध्यक्ष रुपदे यांनी आपल्या मनोगतात माझ्या वर विश्वास ठेवत पद दिले या पदाच्या माध्यमातून गोरगरीब वंचित यांना न्याय देण्याचे काम या माध्यमातून बीड नगरीत इंनरव्हील क्लब च्या रुपाने भरीव कार्य करुन दाखविल असा विश्वास उपस्थितांना यावेळी मनोगतात त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. संचलन पुजा कासट तर सुरेखा लोडा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुणा लोढा, पुष्पा कासट, मधु कोटेचा, पुजा जाजु, शिवकन्या लाहोटी, बसंता कलंत्री, शोभा बडजाते, सुवर्णा पवार, मिरा भंडारी, भारती मुंदडा, वैशाली पाठक, स्मीता धुत आदी उपस्थित होते