चुकलो असे वाटत असेल तर तुम्हाला मातोश्रीचे दारे उघडे-आदित्य ठाकरे

- Advertisement -
- Advertisement -

 

 

नेवासा,

औरंगाबादचा दौरा आटोपून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नगर जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासा मतदारसंघात भर पावसात त्यांची सभा झाली. यावेळी त्यांनी जे बंडखोर आमदार सोडून गेलेत त्यांच्यासाठी राजीनामा देऊन निवडून येण्याचे खुले आव्हान दिले. तसेच त्यांनी का गद्दारी केली हे लोकांना पटवून द्या असेही सांगितले.

मात्र तुम्हाला जर आपण चुकलो असे वाटत असेल तर तुम्हाला मातोश्रीचे दारे उघडे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार चंद्रकात खैरे,  , शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, उदयन गडाख आदि उपस्थितीत होते. भर पावसात आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली.

औरंगाबादचा दौरा आटोपून दुपारी आदित्य ठाकरे यांचे नगर जिल्ह्यात आगमन झाले. नेवासा फाटा येथे युवा नेते उदयन गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भर पावसातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,’ अशा घोषणा देत ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. ठाकरे यांनी पावसात भिजतच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

voter aadhar linking मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी १ ऑगस्टपासून विशेष मोहीम

ठाकरे म्हणाले, ‘डोक्यावर पाऊस पडत असला ती त्यापेक्षा मोठा प्रेमाचा आणि आशिर्वादाचा पाऊस तुमच्याकडून सुरू आहे, तो मला महत्वाचा आहे. सरकार पडल्यावरही एवढे प्रेम मिळाले, हे पाहून मी भारावून गेलो आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी गद्दारी केली. त्यांना आपण काहीही कमी केले नव्हते. मात्र, त्यांच्यावर यासाठी काही दडपण असेल. आता त्यांना जेथे राहायचे असेल तेथे त्यांनी आनंदात रहावे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. मुख्य म्हणजे आपण गद्दारी का केली? हे लोकांना पटवून द्यावे. अशी गद्दारी महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही,’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

 

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या बद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ‘सरकार पडल्यानंतर नेवाशात घेतलेली गडाख यांची सभा पाहून मला ताकद आणि हिंमत मिळाली. असेही लोक आपल्यासोबत आहेत, आपल्यावर प्रेम करीत आहेत, हे पाहून समाधान वाटले. गडाख आणि माझी तशी दोन-अडीच वर्षांचीच ओळख. मात्र, पडत्या काळात गडाखांनी आम्हाला साथ दिली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी माझे वडील उध्दव ठाकरे यांना फोन करून धीर दिला. आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. यालाच आशीर्वाद, प्रेम, महाराष्ट्र धर्म, हिंदुत्त्व म्हणतात,’ असेही ठाकरे म्हणाले.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles