अकोले, ता.८:(शांताराम काळे ) - Advertisement -
- Advertisement -
तालुक्यातील गुहिरे येथील कॉलेज तरुणांनी ७मे रोजी गड किल्ले स्वच्छता अभियान मोहिम अंतर्गत अवघड अश्या पाबरगड वरील खोल्यांची खोदकाम करून साफसफाई केली. पावसाच्या पाण्याने माती खचून खचून खोल्यांचे दरवाजे पूर्णत: बंद झालेले होते न्यू. डायमंड तरुण मित्र मंडळाच्या तरुणांच्या वतीने सफाई मोहीम राबविण्यात आली.त्यावेळी धनंजय कातडे, विकास कातडे करण कातडे,वीरेंद्र कातडे,प्रतीक कातडे आदी तरुण उपस्थित होते
७मे ला दुपारी ४ वा.गड चढायला सुरुवात केली ६ वाजता गडा वरती पोहोचले गुहेत टेंट लावले मुक्काम केला.सकाळी ५.४५ वाजता ला खोदायला सुरूवात केली चार तासात पाबर गड चकाचक करून तरुणांनी आपला आनंद द्विगुणित केला .त्यांच्या या कामाला गिरिप्रेमी नी सलाम केला आहे
स्वछता करताना आलेल्या अडचणी… पावसाच्या पाण्याने दगड माती खाली वाहून आल्याने खोदताना दगड गोटे लागत होते ते काढताना त्रास झाला. खोल्यांचे दरवाजे छोटे असल्या कारणामुळे खोल्यांमध्ये पाणी असल्याने आतील गाळ काढायला अडचण होत होती.मधेच खूप मोठा दगड असल्याने तो मातीत खूप पॅक बसला होता तो काढताना त्रास झाला हाताचे सांलटे गेली मात्र जिद्द चिकाटी धरत ये तरुण गडावरील कुंड स्वच्छ करण्यात यशस्वी झाले .पुढील आठवड्यात रतंनगडवर जाण्याचा त्यांचा मानस आहे. अकोल्यापासून चे अंतर व्हाया राजूर 37.1 km. खड्या चढणीचा ” पाबरगड “भंडारदरा जलाशयाच्या भोवताली कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, रतनगड, घनचक्कर, पाबर दुर्गासारख्या अनेक नामवंत गिरीशिखरांची साखळी व्यवस्थित फेर धरून उभी आहे. हे गिरीमंडळ बहुतेकांना माहीत असतं. पण, याच पंक्तीतला पाबर दुर्ग मात्र, थोडा उपेक्षितच राहिला आहे. भंडारदरा बसस्टँडवर जलाशयाच्या दिशेला तोंड करून उभं राहिल्यावर समोरचं क्षितीज आपल्या अजस्त्र कातळभिंतीने अडवणारा मोठा डोंगर दिसतो. हा डोंगर म्हणजेच दुर्ग पाबर रंधा धबधब्याकडे जाताना पाबरच्या उत्तर शेपटाला वळसा मारुनच जावं लागतं. रतनगडाकडे जाण्याचा गाडीरस्तादेखील याच्या कुशीतूनच आहे. आपल्या चढाईच्या क्षमतेचा कस जोखायचा असेल तर पाबरच्या तिन छोट्या टप्प्यातल्या खड्या चढणीची मजा कधीतरी घ्यायलाच हवी.. Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक
|
खड्या चढणीचा पाबरगड अकोल्यापासूनचे अंतर व्हाया राजूर 37.1 km.
- Advertisement -