- Advertisement -
- Advertisement -
अकोले , (प्रतिनिधी )मवेशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या १९ गावात व १३ग्रामपंचायत असे एकवीस हजार लोकसंख्या पैकी केवळ १२०० व्यक्तींना लसीकरण झाले असून यापैकी इतर ठिकाणाहून आलेल्या व्यक्तीची संख्या अधिक असल्याने याबाबत भाजपचे जिल्हा परिषद गट नेते जालिंदर वाकचौरे यांनी या केंद्रास भेट दिली असता .कमी लसिकरणाबाब त इतकी उदासीनता का ?असे विचारले असता वैद्धकिय अधिकारी यांनी सांगितलेली माहिती आश्चर्य कारक आहे .आरोग्य कर्मचारी लसीकरण व ऑक्सिजन तपासणी साठी गेले असता स्थानिक आदिवासी आम्हाला लस नको आम्ही लस घेतली तर आजारी पडू असे उत्तरे देऊन आरोग्य कर्मचारी यांना अक्षरसा हुस्कवून देत असल्याचे चित्र समोर आले आहे .मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून लसीकरण कमी का?असे विचारणा होत असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी वेळ आरोग्य विभागवार आली आहे .त्यामुळे नाविलाजस्त्व लसीकरण संगमनेर ,अकोले येथील व्यक्तींना द्यावे लागते .
अकोलेचे आरोग्य वरून स्थानिक नेत्यांकडून कान उघडणी होत असल्याने कधी एकदाचा हा कोरोणा जाईल असे मवेशी आरोग्य केंद्राची झाली आहे .स्थानिक सरपंच याबाबत आदिवासी लोकांना लस घेण्यास प्रवृत्त केले किंवा समुपदेशन केले तर निश्चित लसीकरण वाढेल आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे डॉ.वाघ यांनी सांगितले .आदिवासी भागातील पाचनई गावात ५व्यक्ती कोरोना बाधित असून सावरकुठे येथील सरपंच बाधित होऊन मृत्यु झाला मात्र त्यांचे कुटुंब लसी करण करण्यासाठी पुढे येत नाही .आदिवासी भागात लग्न मोठ्या प्रमाणात सुरू असून सामाजिक अंतर ठेवले जात नाही स्थानिक ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका,शिक्षक यांनी लक्ष्य डी आवश्यक आहे .कोट जालिंदर वाकचौरे (जिप. भाजप गट नेते) तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोणा संकट आले असून आजपर्यंत दहा हजारपेक्षा अधिक व्यक्ती बाधित झाले आहे .मृत्यूची संख्या तीनशे पर्यंत गेली आहे मात्र हा सरकारी आकडा दिशाभूल करणारा आहे .तालुक्यात लोकसहभागातून कोरोना काळजी केंद्र आहेत .लोकप्रतिनिधी यांनी अधिक लक्ष्य देणे आवश्यक आहे .पारनेर आमदार लंके झोकून देऊन काम करत असताना हे फक्त उद्घाटन करत आहे.सरकारी निधी तालुक्यात आला मात्र त्याचा ताळमेळ नाही. तहसीलदार याबाबत बोलत नाही .आदिवासी भागात लसीकरण होत नाही त्यासाठी अधिकारी स्थानिक नेत्यांनी समुपदेशन करण्याची गरज आहे .तालुक्यात अकोलेचे आरोग्य चे तीन तेरा वाजले आहे .
st driver attempts sucide एस.टी.चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न!