बीड दि २८ मार्च, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या २६ मार्च पासून बीड जिल्ह्यात संपूर्ण कडकडीत टाळेबंदी करण्यात आली असली तरी कोरोनाचा आकडा वाढत आहे . आज बीड जिल्ह्यात २८४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यातील बाधीतांमध्ये जिल्हा परिषदेतील ६ बाधित, परळी थर्मल कॉलनी मधील 3 बाधित, पाटोदा पोलीस स्टेशन, पाटोदा बस डेपो, पाटबंधारे विभाग पाटोदा आणि वडवणी पोलीस ठाण्यातील एकाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील कोणत्या तालुक्यात किती संख्या आली ?
बीड जिल्ह्यात आढळून आलेल्या २८४ कोरोना बाधित मध्ये अंबेजोगाई ७३,आष्टी ३० ,बीड ५९, धारूर ८, गेवराई ५,केज १३,माजलगाव ३२,परळी ३७,पाटोदा १७,शिरूर ६, वडवणी ४, यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना बाधित आढळून येत आहेत.बीड जिल्हा परिषदेत ६ जण बाधित झाले आहेत. यातून पोलीस ठाणे, बस डेपो, पाटबंधारे कार्यालये सुटली नाहीत.
आष्टी तालुक्यात संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आलेल्या ३० बाधीतांमध्ये आष्टी शहरातील ११, कडा कारखाना 3,केळ ४,खिळद २, सावरगाव १ , डोंगरगण १,जळगाव १,पांढरी १,कडा स्टेट बँकेच्या मागे १,चिखली १,मुर्शद्पूर प्राध्यापक कॉलनी १,सालेवडगाव १,धामणगाव १,आणि जामगाव १ यांचा समावेश आहे.
आणखी वाचा :होळी -धुलीवंदन सण घरीच साजरा करावा