संदीप दराडे, रावसाहेब वाकचौरे यांचे ते आरोप राजकीय व्देषातुनच -भानुदास तिकांडे. सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली राजकारण नको… लोकप्रतिनिधी यांची लाज काढणारांनी स्वतः ची पाञता तपासावी… भाषेत सुधार करावा अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ… राजेंद्र कुमकर भेट दिल्याचे फोटो व्हायरल… आता लाजा कोणाच्या काढायच्या.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक
अकोले तालुक्यातील काल सामाजिक कार्यकर्ते समजले जाणारे
संदीप दराडे यांनी काल आमदार डाॅ.किरण लहामटे यांच्या गंभिर आरोप केले. आमदार यांनी समशेरपुर येथील कोविड सेंटर येथे भेट न दिल्याचा आरोप केला होता माञ हा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी खोडून काढला आहे .यावेळी अकोले तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी बोलताना म्हटल आहे की अकोले तालुक्यातील समशेरपुर येथे आमदार
डाॅ.किरण लहामटे साहेब,पोपटराव दराडे आदींनी भेट दिली आहे.यावेळी स्वतः
संदीप दराडे,रावसाहेब वाकचौरे हे ही यावेळी उपस्थित होते.
माञ जाणीवपूर्वक जर कोणी सहानुभूती मिळवण्यासाठी जर लोकांच्या भावनांचे कोविड काळात राजकारण करु नये.भेट दिली किंवा नाही यासाठी खालील दिलेला फोटो पाहुन खाञी करुन घ्यावी.आपली प्रसिद्धी करण्यासाठी चांगले काम प्रसिध्दी करावी.
आमदार किंवा कोण्या एखाद्या मोठ्या व्यक्ती वर टीका करुन प्रसिध्द होण्यासाठी केलेली खटाटोप ही व्यर्थ असते.
कारण “सत्य परेशान हो सकता है,पराजित नही”याप्रमाणे भेट दिल्याचा फोटोचा पुरावा लपून राहिलेला नाही.असे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी म्हटले आहे .
काल झालेल्या पञकार परिषदेत लोकप्रतिनिधी यांची लाज काढणे यावरुन राजकीय व सामाजिक व्यक्तींचे संस्कार काल समोर आले आहे.
राजकीय व्देषामुळेच हे आरोप करण्यात आले आहेत.तालुक्यात अनेक कोविड सेंटर चालु असुन प्रत्येक कोविड सेंटरला आमदार महो दयांनी भेट दिली आहे.
यामुळे लोकप्रतिनिधी यांची लाज काढणाऱ्या संदिप दराडे यांनी आपली पाञता पहावी,त्यांनी टीका जरुर करावी पण टीका करण्याला मर्यादा असावी फक्त आपली प्रसिद्धी करण्यासाठी जर टीका असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल परंतु हा कालावधी राजकारण करण्याचा कालावधी नाही.
संदीप दराडे यांचा बोलविता धनी कोण आहे.यामुळे उघड झाले आहे.काल मंञी प्राजक्त तनपुरे यांचे नाव घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट सामजिक कार्यकर्ते यांच्या आडुन सुरु आहे.अशा नामधारी सामजिक कार्यकर्ते यांनी राजकीय प्रवेश करावा. सामाजिक कार्यकर्त्याच्या तोंडून राजकीय भाषा शोभत नाही.अशी आक्रमक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर यांनी दिली आहे.
यामुळे आज सोशल मिडियावर आमदार यांनी भेट दिल्याचे फोटो व्हायरल होताच भेट न दिल्याच्या आरोप दराडे यांचा आरोप खोटा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोटा ठरवला आहे.
यामुळे दराडे हे नेमके समाजकारणाच्या आडुन
संदीप दराडे हे राजकारण करत आहेत असच काही चिञ अकोले तालुक्यात निर्माण झाल आहे
या शिवाय प्रशासकीय पातळीवर मदत झाली नसल्याचा आरोप ही खोटा ठरला आहे.
या संदर्भात तशी लिस्ट ही जाहीर झाली आहे.या शिवाय तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही भेट दिली आहे याचा ही फोटो खुद्द दराडे यांनी आपल्या फेसबुकला शेअर केला आहे.
यामुळे सामजिक कार्यकर्ते संदीप दराडे यांचा पोपट झाल्याची चर्चा अकोले तालुक्यात सुरु झाली आहे…