औरंगाबाद
कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग तूर्तास ५ डिसेंबर पर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडये यांनी घेतला आहे.
दुसरीकडे मुबई महानगरपालिकेने 1 ली ते ७ वीचे वर्ग 15 डिसेंबर पासून सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे.
यासंदर्भात महापालीकेच्या शिक्षण विभागाने पत्रक काढून जाहीर केले आहे. नवीन आलेल्या ओमीयक्रोन या वेगळ्या वेरीयंट च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले.
शाळा कधी सुरु होणार
औरंगाबाद शहरातील आणि औरंगाबाद मनपा कार्यक्षेत्रातील 1 ली ते ७ वीच्या शाळा ह्या 5 डिसेंबर पर्यंत बंद असणार आहेत. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १लि ते ७ वी पर्यंतच्या शाळा 1 डिसेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेच्या आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितली.
पुढे कोरोनाची परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा :बीड जिल्ह्यातील 11 कुटुंबियांना मिळणार 10 लाख