आष्टी : प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे शिक्षकाचे भरदिवसा घर फोडून वीस तोळे सोन्यासह रोख तेवीस हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
भरदिवसा झालेल्या चोरीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि,आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील वस्तीवर रमेश देवराव तळेकर यांचे घर आहे.
घराच्या लगतच त्यांची शेती असून सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व जण मूग तोडणीसाठी शेतात गेले होते.
हीच संधी साधून अज्ञात दोन चोरट्यांनी घराचे दार तोडून कपटाचे कुलूप तोडत कपाटातील वीस तोळे सोन्याचे दागिने,तेवीस हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला आहे.
वीस तोळे सोन्यासह रोख तेवीस हजार रुपये लंपास
या संदर्भात दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी पोलीस ठाण्यात १ लाख ७२ हजार ४३८ इतक्या तत्कालीन किमतीचे दागिने अशी नोंद करण्यात आली आहे.
तर रोख रक्कम रुपये 23 हजार मिळून १ लाख ९५ हजार ४३८ रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एवढी मोठी चोरी झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बी यु मोरे करत आहेत.
७६९ बाधितांची रुग्ण संख्येत भर;८८३ रूग्णांना डिस्चार्ज