मिनी जेरुसलेम मध्ये ख्रिस्ताच्या जन्मोत्सावासाठी चर्च सजले

- Advertisement -
- Advertisement -

मिनी जेरुसलेम मध्ये ख्रिस्ताच्या जन्मोत्सावासाठी चर्च सजले

 

अहमदनगर

 

मिनी जेरुसलेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर येथे  येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा होत आहे .त्यासाठी जिल्ह्यातील सर्व  चर्च सजली आहेत .रात्रीच्या ख्रिस्त जन्मानंतर सकाळी चर्च मध्ये  ख्रिस्ताची प्रार्थना घेऊन हा आनंदोत्सव साजरा होत असतो.

 

नगर मधील 138 वर्षापूर्वीच्या सेंट सेविअर्स  चर्च च्या अंतर्गत आणि बाह्य परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे चर्च नागरिकांचे आकर्षण झाले आहे.

 

चर्चला असलेल्या मोठ्या परिसरातील खांब आणि झाडे आकर्षक रंगीबेरंगी उजेडाने उजळली आहेत.

 

 

 

 

नगर मध्ये ख्रिसमस निमित्ताने गेल्या आठवड्या पासून ख्रिस्त धर्मियांनी घरोघरी जाऊन ख्रिस्त जन्माचे गाणे गायले.

ख्रिसमस निमित्ताने अहमदनगर शहरातील आणि जिल्ह्यातील  अनेक चर्च आणि घरे प्रकाशाने लख्य उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि ख्रिसमस वृक्ष भाविकांचे लक्ष आकर्षून घेत आहे. यंदा कोरोना नियम पाळून हा उत्सव साजरा केला जात असल्याचे सेंट सेविअर्स चर्चचे प्रशांत पगारे यांनी सांगितले.

 

भन्नाट जुगाड;दुचाकी आणि भंगारातुन बनवली चारचाकी टुमदार गाडी

 

 

 मिनी जेरुसलेम सेंट सेविअर्स चा इतिहास

 

अहमदनगर मध्ये ख्रिस्ताची मोठी परंपरा आहे. भारतात सर्वात मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन मिशनरी यांनी ख्रिस्त धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे जिल्ह्यातील अकोले पासून जामखेड पर्यंत हा धर्म प्रसार झाला.

दरम्यान या जिल्ह्यात मोठे मोठे चर्च उभे राहिले आहेत. गोथिक शैलीतील हे चर्च पुरातन असल्याची साक्ष देतात.

sai baba udi prasad online लाडू विक्री काऊंटर सुरु 

अहमदनगर येथील सेंट सेविअर्स ची सुरुवात १८७३ मध्ये सुरुवात झाली. चर्च ऑफ इंग्लंड च्या वतीने या कॅथेड्रलचा प्रारंभ करण्यात आला.

 

सन १८८१ मध्ये बंगला नं. १ मध्ये सूरु करण्यात आले. याच काळात ही जागा विकत घेऊन त्यावर बांधकाम करण्यात आले. तीन वर्षात हे कॅथेड्रल तयार झाले.  साधारणपणे दगडी चिरा वापरून हे  कॅथेड्रल cathedral बनविण्यात आले आहे.

अहमदनगर ते आष्टी दरम्यान धावणार हाय स्पीड रेल्वे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles