पोलीस कॉन्स्टेबल ने महिला तक्रारदारकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे उघड झाले. पीडितेनेच हा प्रकार चव्हाट्यावर आणला. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तिने या पोलिसाच्या विरोधात तक्रार केली आहे.
संबंधित पोलीस कॉन्स्टेबल आर्थिक शोषण करत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतो.
त्याला तत्काळ निलंबन करण्यात यावे, असे तक्रारीत म्हटले आहे.
मी विधवाअसून दीर व माझ्यात जमिनीचे वाद सुरु आहेत. घरगुती त्रासाबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पोलीस कॉन्स्टेबल ने माझ्याशी ओळख वाढवून मी एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सुरु केले.
तो सातत्याने शरीरसुखाची मागणी करत आहे. या पोलीस कॉन्स्टेबल ने माझी बदनामी सुरु केली असून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या पोलिसाने माझे व मुलांचे जगणे अवघड केले असून आत्महत्या करण्यास तो भाग पाडेल.
तर राजूर पोलिस स्टेशनला महिला पोलिस कर्मचारी यांची एका वरिष्ठ पोलिसाने छेड छाड करून आघावपणा केल्याने त्याची तडकाफडकी नगर ऑफिसला बदली करण्यात आली आहे .
तर राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्तव्यदक्ष असून त्यांनी याबाबत वारीश्ताना अहवाल पाठवून कारवाई केल्याबद्दल त्यंचे अभिनंदन होत आहे .
राजूर पोलीस स्टेशनला यापूर्वी खोट्या केसेचे सत्र सुरु होते तसेच अवैध्य व्यवसायाला बळ दिले जात असल्याने ग्रामस्थ नाराज होते मात्र सपोनी नरेंद्र साबळे आल्याने पोलीस खाते काम करत आहे मात्र महिला पोलीस कर्मचारी यांना त्रास दिल्याबद्दल त्यामुळे अकोले व राजूर पोलीसाबाबत नाराजी व्यक्त होत आहे .