१९ वर्षांनंतर भारताचे आंतरराष्ट्रीय भालाफेकीत मोठे यश.
ओरेगॉन (USA):
भारताच्या नीरज चोप्रा ने जागतिक मैदानी स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
पुरुषांच्या भालाफेक प्रकारात त्याने ८८.१३ मीटर भाला फेकत रौप्य पदकाला गवसणी घातली.जागतिक स्पर्धांमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देत नीरज चोप्रानं इतिहास रचला आहे.
अंजु बॉबी जॉर्जनंतर १९ वर्षांनी भारताला जागतिक स्पर्धेत पदक मिळाले. क्रिकेटवेड्या भारतात असा खेळाडू जन्माला येणे म्हणजे एक प्रकारे चमत्कारच मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला अविनाश साबळे शी संवाद
नीरज चोप्रा ने अशी केली कामगिरी
यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये पदकं मिळवून भारताचा गौरव नीरज चोप्राने वाढवला आहे.जागतिक स्पर्धेतही नीरजकडून सर्वांनाच सरस कामगिरीच्या अपेक्षा होत्या.
या अपेक्षा सार्थ ठरवत नीरजने भालाफेक प्रकारात आपलं कसब दाखवून दिलं.त्याने चौथ्या प्रयत्नात फेकलेला भाला हा ८८.१३ मीटर लांब गेला आणि त्याच्या नावे रौप्य पदक नोंदवलं गेलं.या स्पर्धेत ग्रेनेडियाचा भालाफेकपटू अँडरसन पीटर्सने सुवर्णपदकाची कमाई केली.
त्याने फेकलेला भाला ९०.५४ मीटर लांब गेला.तर चेक रिपब्लिकचा भालाफेकपटू जॅकब वॉचेल याने या क्रीडा प्रकारात कास्यपदकाची कमाई केली.
त्याने फेकलेला भाला ८८.०९ मीटर लांब गेला.नीरज चोप्राच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.