दहशतवाद विरोधी पथक आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलचा मुख्य जेरबंद

- Advertisement -
- Advertisement -

 

 

 

 

मुंबई- प्रतिनिधी

दहशतवाद विरोधी पथक, जुहू युनिट, मुंबई येथे प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार केलेल्या कारवाईत आरोपी नामे सोहेल युसुफ मेमन यास एकुण ५ किलो ६५ ग्रॅम ‘मेफेड्रॉन (एम.डी.)’या अंमली पदार्थासह अटक करण्यात आली होती.सदर अंमली पदार्थाची (आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे रू. २.५३ करोड ) अशी होती.

अटक आरोपी सोहेल युसुफ मेमन याने सदरचा अंमली पदार्थ हा त्याचा साथीदार आरोपी नामे निरंजन जयंतीलाल शहा याचेकडुन प्राप्त केल्याचे सांगीतले होते.

यावरून दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे गु.र.क्र. १३/२१ कलम-८(क) सह २२, २९ एनडीपीएस कायदा १९८५

अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन निरंजन जयंतीलाल शहा यास सदर गुन्हयात पाहीजे आरोपी म्हणुन दर्शविण्यात आले होते.

सदर गुन्हयाच्या पुढिल तपासामध्ये अशी माहिती समोर आली होती की, पाहीजे आरोपी निरंजन शहा हा मुंबई, दिल्लीतील विविध पोलीस ठाणे तसेच अंमली पदार्थ विरोधी शाखा, मुंबई, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, महसुल गुप्तचर संचनालय ( D.R.I. ), इत्यादी ठिकाणी अभिलेखावरिल ज्ञात गुन्हेगार होता.

तसेच १९९० च्या दशकातील कुप्रसिध्द शेअर मार्केट घोटाळयातील मुख्य आरोपी हर्षद मेहता याचा देखिल तो सहकारी होता. त्याचे विरूध्द आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथे फसवणुकीचा गुन्हा देखिल दाखल आहे.

दहशतवाद विरोधी पथक आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेल चा मुख्य सदस्य दिल्लीमध्ये जेरबंद

पाहिजे आरोपी निरंजन शहा याचा दहशतवाद विरोधी पथकाकडुन निरंतर शोध घेण्याचे काम सुरू होते.

तथापी अतिशय चाणाक्ष व धुर्त असलेला पाहीजे आरोपी हा मुंबई बाहेर पळुन जावुन मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हैद्राबाद व कर्नाटक अशा वेगवेगळया राज्यात जागा बदलुन, वेशांतर करून स्वत:स लपवत होता.

अशा परिस्थितीत त्याचा शोध घेवुन त्यास अटक करणे अतिशय जिकरीचे व कठीण आव्हान म्हणुन समोर उभे असताना दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहु यूनिट ने तो दिल्ली मध्ये असल्याची अचुक माहिती काढली.

दिल्ली शहरातील मुनेरका गाव, नवी दिल्ली या परिसरामध्ये स्वत:ची खोटी ओळख दाखवुन एक सिंगल रूम भाडयाने घेवुन एक गरीब इसम असल्यासारखे तो तेथे वावरत होता.

दविपच्या जुहु युनिटने अतिशय शिताफीने त्याचा शोध घेवुन दिनांक १७/०८/२०२१ रोजी त्यास दिल्ली येथुन अटक करण्यात यश प्राप्त केले. आज रोजी त्यास मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दिनांक २५/०८/२०२१ पर्यत पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे.

सदरची कारवाई ही दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक मा.श्री. विनित अग्रवाल यांच्या आदेशानुसार मा. पोलीस उप महानिरीक्षक शिवदीप लांडे, पोलीस उप अधीक्षक  सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदरची कारवाई ही सपोआ श्री. श्रीपाद काळे यांच्या थेट देखरेखीखाली जुहु युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वाघ, सपोनि सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर व पोलीस पथकाने पार पाडली.

 

 

आणखी वाचा:टाकळी अमिया येथे भरदिवसा शिक्षकाचे घर फोडले; वीस तोळे सोन्यासह रोख रक्कम लंपास

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles