दत्तजयंतीच्या निमित्ताने उजळले दत्तमंदिर
नगर,
दत्तजयंतीच्या निमित्तीने अहमदनगर शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील गुरुदत्त भक्तिधाम विद्युत रोषणाईने उजळले आहे.
मंदिरावर आणि औदुंबराच्या वृक्षासह परिसरांत रोषणाइ करण्यात आली आहे. भगवान दत्तजयंती च्या निमित्ताने देवगड येथील दत्त मंदिराची प्रतिकृती असलेल्या संत किसनगिरी नगर मध्ये हा उत्सव होत आहे .
या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.सकाळी अभिषेक आणि नित्यपूजेने उत्सवाची सुरुवात होणार असून दिवसभर भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
सायंकाळी संगीत भजन आणि त्यांनतर दत्त जन्मोत्सवाला प्रारंभ हॊणार असल्याचे येथील विश्वस्त् संजय नेहूल यांनी सांगितले.या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन येथील विश्वस्त मंडळाने केले आहे.