बीड- प्रतिनिधी
जिल्हा शिक्षक पुरस्कार आज अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
दरवर्षी 5 सप्टेबर रोजी जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरीत केले जातात मात्र कोविड19 च्या संसर्गामुळे पुरस्कार प्रक्रिया उशिरा राबविण्यात आली. विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर पुरस्कार घोषित करण्यात आले.
प्राथमिक विभागातून 11, माध्यमिक विभागातून 10 आणि एक विशेष पुरस्कार असे 22 पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
जिल्हा नियोजन सभागृह येथे या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ ह्या असणार आहेत.यावेळी विधान परिषद सदस्य संजय दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती बजरंग सोनवणे,यांच्यासह जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार उपस्थित असणार आहेत.
जिल्हा शिक्षक पुरस्कार चे मानकरी हे आहेत
प्राथमिक विभाग
श्रीमती भारती अनिता हरिशचंद्र, जि.प.मा.शा. पूस अंबाजोगाई,
झिंजुके आप्पा विठोबार स.शि. जि.प.प्रा.शा. पिंपरी घाटा,आष्टी,
श्रीमती शेख मुनवर सुल्ताना म. युसुफ मु.अ. जि.प.प्रा.शा.रोशनपुरा बीड,
लासुने तानाजी पुंडलिक जि.प.प्रा.शा.सोनीमोहा धारुर,
शिंदे गंगाराम देवीदास प्रा.प जि.प.प्रा.शा.मिरकाळा,गेवराई,
श्रीमती शिंदे ज्योती रंगनाथ स.शि.जि.प.प्रा.शा.तांबवा केज,
पठाण ताहेरखॉन इब्राहीमखान स.शि. जि.प.प्रा.शा. मंगरुळ नं.३ माजलगांव,
फड अंकुश माणिकराव प्रा.प जि.प.प्रा.शा.इंदपवाडी परळी वै.
पवार अशोक बापुराव स.शि. जि.प.प्रा.शा.कोतन, पाटोदा,
श्रीमती नागरे मंगल बापुराव स.शि. जि.प.कें.प्रा.शा. रायमोहा शिरुर
सोळंके हरिदास रावसाहेब स.शि. जि.प.प्रा.शा.भोटा नाईक तांडा , वडवणी.
जिल्हा शिक्षक पुरस्कार माध्यमिक विभागातून
कवडे चंद्रकांत नारायण ,जि.प.मा.शा. डिघोळ अंबा अंबाजोगाई
दळवी सतीश त्रिंबकराव जि.प.कन्या प्रशाला आष्टी,
गोसावी पोपट भिमराव स.शि. जि.प.मा.शा. चौसाळा बीड
इंगळे शंकर लिमन स.शि. जि.प.मा.शा.धारुर
चव्हाण लहू लक्ष्मण स.शि. जि.प.मा.शा. धोंडराई गेवराई
क्षीरसागर महादेव वसंतराव जि.प.मा.शा. भाटुंबा,केज
राठोड पांडुरंग जेमी स.शि. जि.प.मा.शा. मुलांची माजलगांव
श्रीमती गर्जे अनिता बालाजी स.शि. जि.प.मा.शा. मुलांची परळी
घायाळ बबन रामकिसन स.शि. जि.प.मा.शा. डोंगरकिन्ही,पाटोदा,
काळे प्रताप दत्तात्रय स.शि. जि.प.मा.शा. खोकरमोहा शिरूर कासार.
विशेष शिक्षक म्हणून श्रीमती समुद्र मंगल पांडुरंग
शा. शि. जि.प. कन्या प्रशाला, माजलगांव यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
आणखी वाचा:खासदार प्रीतम मुंडे यांनी केला हा आरोप