अनाथांचा नाथ झाला आधार घर तर होईलच पण शिक्षणाचे कवाडे उघडली

- Advertisement -

राजूर (शांताराम काळे )कुमशेतं येथील  प्रचंड वादळात अनाथ मुलांचे घर उध्वस्त झाले त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने समाज मंदिरात आश्रय घेतला .रात्र जागवून काढलीयाबाबत वृत्तपत्रात  या मुलांची व्यथा जनतेसAKL17P2 AKL17P4 1 AKL17P3 kumshet 1 IMG 20210524 111756 IMG 20210524 110620 IMG 20210518 161023मोर आणली नी संगमनेर येथील आधार संस्थेने या अनाथ मुलांना आधार दिला केवळ घराचे पत्रे नाही तर  त्यांच्या  शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलली आहे .आज राजूर येथील लक्ष्मी नारायण या दुकानातून ४८पत्रे व इतर साहित्याची मदत केली यावेळी  पिडीत ग्रस्त भाऊ अस्वले,लालू अस्वले,आधार संस्थेचे अध्यक्ष सुखदेव इल्हे ,डॉ.गोरडे,सरपंच सयाजी अस्वले,लोक पंचायत चे हनुमंत उबाळे जेष्ठ पत्रकार शांताराम काळे,ललित चोथवे उपस्थित होते.तर अकोले येथील आनंद विसपुते,जोंधळे सर यांनी या कुटुंबाला घरपोच धान्य व किराणा साहित्य दिले .तर यापूर्वीच मारुती शेंगाळ,मिनाक्षी शेंगाळ यांनी भरीव मदत केली.त्यामुळे हे कुटुंब भावूक झाले .तुम्हीच आमचे मायबाप असे सांगत त्यांनी कुम शेत सरपंच व ग्रामस्थांचे आभार मानले 

सुकदेव ईल्हे (आधार संस्था)वृत्तपत्रातून आम्हाला कुमशेत येथील अनाथ मुले काळा बाई अस्वले,बा रकु अस्वले,लालू अस्वले,भाऊ अस्वले या अनाथ मुलांचे घर वादळाने उडाले .त्यामुळे आम्ही आज या कुटुंबाला पत्रे व शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना आधार देत आहोत

आनंद विसपुते कुमशेत येथील अनाथ मुले वादळाने उध्वस्त झाले त्यामुळे आमचे वरिष्ठ अधिकारी  खुळे यांनी  व आम्ही मिळून या कुटुंबाला किराणा व धान्य दिले आहे .इतरांनी यांना मदत करावी 

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles