यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहच्या निमित्ताने तीन दिवस साहित्यिक मेजवानी

- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई

Yashwantrao chavan smruti samaroh ambajogai अंबाजोगाई शहरातील नागरिकांसाठी सोमवार पासून तीन दिवस साहित्यिक मेजवानी मिळणार आहे. कथा कविता आणि विचार यानिमित्ताने साहित्य प्रेमींना मिळणार आहे. अंबाजोगाई मधील हा ४० वा समारोह आहे.

दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. या समारोहाचे उद्घाटन प्रख्यात गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून सुप्रसिद्ध अभिनेते व सिनेमा, मालिका निर्माते किरण माने हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.


रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी ठाणे येथील ज्येष्ठ कवियत्री डॉ. प्रज्ञा दया पवार ह्या राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अकोला येथील सुप्रसिद्ध कवी गझलकार गोपाळ मापारी हे करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी डॉ. वृषाली किन्हाळकर – नांदेड, प्रा. सिसिलिया कार्व्हालो – वसई, संगिता बर्वे – पुणे, संजय चौधरी – नाशिक, बालाजी मदन इंगळे- उमरगा, रमजान मुल्ला- सांगली, जयंत चावरे – यवतमाळ, पूजा भडांगे – बेळगाव, सुनिती लिमये – पुणे, बालाजी सुतार – वर्धा (अंबाजोगाई), नारायण पुरी- छ्त्रपती संभाजीनगर, नितीन वरणकार – शेगांव व संजय आघाव – परळी यांचा सहभाग राहणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ४० वे वर्ष असून चार दशकपूर्ती तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, चित्रकला स्पर्धा, बालआनंद मेळावा, कृषी परिषद, सुफी व गजल गायन शास्त्रीय संगीत सभा, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, समारोप समारंभ संपन्न होणार आहे.
मंगळवार, दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहेत. सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून मुलांच्या आत्मबळ निर्माण करणारे राजेंद्र बहाळकर पुणे हे अध्यक्ष असतील तर यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळ सराफ व आनंदवन वरोरा येथील धान्य रांगोळीकार चित्रकार प्रल्हाद ठक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व शालेय चित्रकला स्पर्धेचे विजेते यांना परितोषिके प्रदान करतील. रांगभरण शालेय सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल व दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उतेजनार्थ विजेत्यांना रोख बक्षीस पाहुण्यांच्या हस्ते दिले जातील.
. सायं. ८ वा. सुगम संगीताचे आयोजन केले आहे. मुंबई येथील सुप्रसिद्ध सुफी व गझल गायिका पूजा गायतोंडे यांचा मराठी, उर्दू, हिंदी गझल गायनाचा रंगरेझा हा संगीतबद्ध सादर करतील. साथसंगत – कीबोर्ड – मनोज राऊत, तबला – शंतनु मायी, ढोलक साथ योगेश ईंदोरिया यांचीअसेल. २७ तारखेस शेतकरी परिषद, समारोप समारंभ, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, शास्त्रीय संगीत मैफिल होईल.
रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे व इतर सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles