अहिल्यानगर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर येथे मा. अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर श्रीमती अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शना खाली जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थानी मा. श्री. आर. एस. रोटे, मुख्य न्यायदंडाधिकारी, अहमदनगर हे होते.
श्रीमती. जे. डी. उपरकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांनी उपस्थितांना सदर विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगरचे सचिव मा. श्रीमती, भाग्यश्री पाटील यांनी केले.
प्रास्ताविक करतांना मा. श्रीमती. भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, ३१ मे हा दिवस तंबाखू विरोधी दिन जागतिक आरोग्य संघटना मार्फत साजरा करण्यात येतो. world tobacco free day 2025 तंबाखूच्या सेवनाने होणारे दुष्परीणाम व त्यामुळे होणा-या अकाली मृत्युमुळे संपूर्ण कुटूंबाची वाताहत होते.
या बाबी ख-या अर्थाने समाजातील सर्व घटकांनी समजून घेवून तंबाखूचे व्यसनापासून दूर रहावे, त्यासाठी सर्वानीच प्रयत्नशील राहून त्याबाबत जागृकता निर्माण केली पाहिजे.
मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना श्रीमती. जे. डी. उपरकर, दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अहमदनगर म्हणाल्या की, अहमदनगर जिल्हा न्यायालयातील इमारत अत्यंत स्वच्छ आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा खावून थुंकणे हे चुकीचे आहे तसेच गुन्हा आहे.
परंतु प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे हे अंगीकारले तर शिक्षा करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. अहमदनगर न्यायालयात आल्यानंतर ख-या अर्थाने न्यायमंदिरात आल्याची भावना होते.
अध्यक्षीय समारोप करतांना मुख्य न्यायदंडाधिकारी मा. आर. एस. रोटे यांनी सांगितले की, कुठलेही व्यसन आरोग्यास हानीकारक आहे. प्रत्येक वकील बांधवांनी आप आपल्या पक्षकारांना सक्त ताकीद देवून न्यायालयीन आवारात तंबाखू गुटखा सेवन न करण्याबाबत सांगितले तरीही ब-याच मोठ्या प्रमाणात स्वच्छता राहील.
अहमदनगर न्यायालयाची इमारत सन २०१७ पासून वापरात असली तरीही या इमारतीची पवित्रता वकिल बांधवांनी राखली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. श्री. राजाभाऊ शिर्के व आभार प्रदर्शन अॅड. श्री. सागर पादीर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी अॅड. सुरेश लगड, अॅड. संतोष वाळूज, अॅड. अनुराधा येवले,
अॅड. श्री. कश्यप तरकसे, अॅड, जरजरीबक्ष शेख, अॅड, मच्छिंद्र देठे, अॅड, गौरव दांगट, अॅड. विराज लगड, अॅड. नितीन खैरे, अॅड. रुपाली पठारे, अॅड, बेबी बोर्डे, अॅड. सिध्दार्थ वाघमारे,
अॅड. पंडूरे, अॅड. ज्ञानेश्वर दाते, अॅड. आनंद सुर्यवंशी, अॅड. रेश्मा गांगर्डे तसेच इतर विधिज्ञ व मित्र प्रा.श्री. धिरडे, श्रीमती. शोभा गाडे, कु, नगरकर, श्रीमती. इथापे हे हजर होते.