बीड
Weather alert beed जिल्ह्यात दोन दिवस हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासात 16.2 मिलिमिटर इतका पाऊस झाला असून जिल्ह्यातील अंबाजोगाई, किल्ले धारूर तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
बीड जिल्ह्यात दिनांक 26 आणि 27 या दोन दिवशी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये शनिवारपासून पावसाने हजेरी सुरू लावलेली आहे. रविवार सोमवार या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. मागील 24 तासांमध्ये झालेल्या पावसात जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि किल्ले धारूर या दोन तालुक्यातील दोन महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. यात अंबेजोगाई तालुक्यातील बर्दापुर मंडळ येथे (७२.८ मिमी) तसेच धारूर तालुक्यातील धारूर मंडळात (८१.३ मिमी) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. पावसाळ्याच्या अखेरीस पावसाने बीड जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील बीड तालुक्यात 3.5 पाटोदा तालुक्यात 10.3 आष्टी तालुक्यात 15.5 गेवराई तालुक्यात 5.2 माजलगाव तालुक्यात 29.1 अंबाजोगाई तालुक्यात 44.2 केज तालुक्यात 15.5 परळी तालुक्यात 15.8 धारूर तालुक्यात 52.5 वडवणी तालुक्यात 11.8 शिरूर तालुक्यात 5.6 मिलिमिटर इतका पाऊस झाला आहे. आष्टी तालुक्यातील कडा मंडळात 48.8 तर आष्टी मंडळात 25 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.