नांदेड
Two teachers from Latur arrested in NEET paper leak case नीट neet परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण आता थेट राज्यातील डॉक्टर बनविणाऱ्या लातूर पर्यंत पोहचले आहे. या पेपरफुटी मध्ये येथील दोघाजणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे.त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे नांदेडच्या एटीएस विभागाने सांगितले.
वैद्यकीय नीट परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी आपल्या पालकांसह लातूर मध्ये राहतात. राज्यातील अनेक भागातून लातूर येथे गर्दी होत असते,किंबहुना येथील अनेक स्थानिक व्यावसायिकांची रोजीरोटी या वर अवलंबून झाली आहे. येथील कोणत्याही छोट्या मोठ्या क्लासला मान्यता मिळते. त्यामुळे राज्यातून हुशार मुले या ठिकाणी येत असतात. त्यामुळे येथे शिक्षणाच्या काळ्या धंद्यांना ऊत आलेला दिसतो.
पर राज्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना पोलीस कार्यालयात चौकशी साठी बोलावले होते . संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे.
वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घाेटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट व जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर, लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.
[…] नीट पेपर फुटी प्रकरण लातूर येथील दोन श… […]