यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे शानदार उदघाटन

- Advertisement -
- Advertisement -

विचार आणि आचार संकुचित होणा-या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज तुषार गांधी यांचे मत

अंबाजोगाई (प्रतिनिधी)-


Tushar Gandhi yashvantrao chavan smruti samaroh विचार आणि आचार संकुचित होणा-या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज आहे असे मत गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.


येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उदघाटक म्हणून तुषार गांधी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रख्यात सिनेअभिनेते तथा चित्रपट व मालिकांचे दिग्दर्शक किरण माने होते तर व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण
स्मृती समारोह समितीचे सचीव दगडु लोमटे, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे उपस्थित होते.


यावेळी बोलताना तुषार गांधी पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्या सारखी माणसं होवून गेली का नाही अशी शंका निर्माण होणाऱ्या परिस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी अशा तीन दिवसीय समारोहाचे आयोजन करण्यात येते ही खुप समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले
यशवंतराव चव्हाण यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत खुप महत्वाचा वाटा आहे. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी दिला. भारत चीन घ्या युद्धकाळात संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा ही त्यांनी उल.लेख केला.


आजच्या परिस्थितीत संपूर्ण देशभर संविधान विरोधी वातावरण निर्माण करण्याचे काम किमी जण जाणीवपूर्वक करीत आहेत अशा परिस्थितीत याविरुद्ध सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन तुषार गांधी यांनी केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रख्यात सिने अभिनेता दिग्दर्शक किरण माने यांनी आपल्या भाषणात किरण माने यशवंतराव चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी मला उपस्थित राहता आले हे माझं भाग्य. यशवंतराव चव्हाण हे गोरगरीब, शोषीत दलीत यांच्या उध्दारासाठी झटणारे नेते होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी देवराष्ट्र या गावात असपृशांसाठी शाळा महर्षी वि. रा. शिंदे यांच्या हस्ते सुरू केली.
यशवंतराव चव्हाण हे समाजकारणातुन राजकारणात आले. आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री, उपपंतप्रधान झाले. सत्तेचा कैफ आपल्या डोक्यात न जावू देणारा हा नेता होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा असला तरी निर्मितीनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत आपला काहीही सहभाग नाही हे ठासून सांगणारा हा नेता होता. यशवंतराव चव्हाण हे तरल संवेदनशीलता, समाजभान, गरीबांची जाण असलेला नेता होता. अशा या थोर माणसांच्या विचारांचा जागर होणार महाराष्ट्रातील अंबाजोगाई हे एकमेव गाव असल्याचा आपल्या अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी दीपप्रज्वलन व यशवंतराव चव्हाण, व स्व.भगवानराव लोमटे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचीव दगडू लोमटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक त्यांनी या समारोहाची सुरवात ३९ वर्षापुर्वी या समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.श्री. भगवानरावजी लोमटे उर्फ बापू, भगवानराव शिंदे व त्यांच्या सहका-यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी केली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या निर्मिती साठी यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणाऱ्या साहित्य, कला-संगीत, कृषी आणि युवा शक्ती यांची सांगड घालत यासर्व बाबींची माहिती या तीन दिवसीय यशवंराव चव्हाण स्मृती समारोहात देण्यात येते. या पुर्वी आयोजित करण्यात आलेल्या स्मृती समारोहाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक मान्यवर विचारवंतांनी आपली हजरी लावली असून आज या समारोहाचे उदघाटन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते व प्रख्यात सिनेअभिनेते तथा अनेक चित्रपट व मालिकांचे दिग्दर्शक किरण माने यांच्या हस्ते होत आहे याचा आपणास मनस्वी आनंद होतो आहे असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सतीष लोमटे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा. मेघराज पवळे यांनी मानले.

यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. मेघराज पवळे यांनी मानले.उदघाटन समारंभानंतर रात्री ठाणे येथील ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखालील रंगदार कवी संमेलन संपन्न झाले.
या कवी संमेलनाचे बहारदार सूत्र संचलन अकोला येथील सुप्रसिद्ध कवी गझलकार गोपाळ मापारी यांनी केले तर या कवी संमेलनात
डॉ. वृषाली किन्हाळकर (नांदेड), प्रा. सिसिलिया कार्व्हालो (वसई), संगीता बर्वे (पुणे), संजय चौधरी (नाशिक), बालाजी मदन इंगळे (उमरगा), रमजान मुल्ला (सांगली), जयंत चावरे (यवतमाळ), पूजा भडांगे (बेळगाव), सुनिती लिमये (पुणे), बालाजी सुतार (वर्धा-अंबाजोगाई), नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर), नितीन वरणकार शेगाव आणि संजय आढाव परळी यांचा सहभाग होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles