अहमदनगर
tuljapur mahila pujari तुळजापूरच्या मंदिरात महिला पुजारी ठेवायला काय हरकत आहे? असा प्रश्न विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विचारला आहे. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
राज्यातील अनेक मंदिरांमध्ये महिलांना गाभार्यात प्रवेश मिळतो. त्यामध्ये शनी शिंगणापूर, शिर्डी यांचा समावेश आहे. मात्र अजूनही तुळजापूर येथे भवानी मंदिराच्या tuljapur bhavani गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारला जातो. येथे मात्र पुरुषांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे हा दुजाभाव असल्याचे सांगून त्यांनी महिलांना प्रवेश मिळावा अशी सूचना केली.
दुभंगलेली मने लोकन्यायालयामुळे पुन्हा जुळून आली
जिथपर्यंत पुरुष भाविक जातात तिथपर्यंत महिलांना प्रवेश का दिला जात नाही ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. या मंदिरांमध्ये पुरुष गाभार्यात जाऊन देवीची पूजा करतात .मग त्याच कुटुंबातील महिलांना पण तो मान का मिळत नाही. तुळजापूर tulja bhavani येथे शामल पवार यांचे कुटुंबीय हे या मंदिराचे पुजारी आहेत.त्यांची मंदिरात जाऊन देवीची पूजा करण्याची इच्छा आहे मात्र त्यांना मंदिरात जाऊन पूजा करण्याची संधी दिली जात नाही. इतरांना जाऊ देत नाहीत हे ठीक आहे मात्र ज्य्ता कुटुंबियांना पूजेचा मान आहे त्यांच्या कुटुंबातील महिलांना हा मान मिळाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.अशीच स्थिती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या kolhapur ambabai मंदिराच्या बाबतीत आहे. महिलांच्या बाबतीत असलेला दुजाभाव बंद केला पाहिजे.
राज्य सरकार येत्या 8 मार्च ला महिला धोरणाची घोषणा करणार असून या धोरणात महिलांसाठी समान नागरी कायदा,असंघटित महिलांसाठी कायदा यासह महिलांच्या इतर मुद्द्यांवर भर दिला असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या संदर्भात महिला संस्थानी महिला आमदारांनी सूचना द्यावीत, महिला संस्थाने ही सुचणा कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. साई संस्थानने आपला निधी कोविड मुळे निराधार झालेल्या विद्यार्थी आणि विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी करावा अशी सूचनाही केली.