अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ग्रामस्थांचे गावबंद आंदोलन 

tisgaon villagers to regulate encroachments


तिसगाव 
tisgaon villagers to regulate encroachments येथील ग्रामपंचायत च्या जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. या अतिक्रमण धारकांनी गावबंद ची हाक दिली.

यामुळे  दिवसभर सर्व दुकाने बंद होती. तर सर्व व्यवहार ठप्प झाले. तिसगाव मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित आहे. ग्रामपंचायत च्या मालकीची असलेली जमीन गट क्रमांक ४९६ या 23 एकर गायरान क्षेत्रावर ४०० हून अधिक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. 

in article

यामध्ये ग्रामपंचायत च्या वतीने ना हरकत प्रमाणपत्रे देऊन घरकुले बांधण्यात आली आहेत. तसेच याची सरकार दप्तरी नोंद पण आहे. तर व्यावसायिक जागेसाठी ग्रामपंचायत ने तात्पुरत्या स्वरुपात बांधकाम परवाने दिले आहेत. या संदर्भात काही दिवसापूर्वी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांनी अतिक्रमण धारकांना नोटीसा दिल्या आहेत.

त्यामुळे खळबळ उडाली आहे. या अतिक्रमण धारकांनी ग्रामपंचायत समोर आंदोलन हि केले आहे. याबाबत येथील काही नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने या अतिक्रमण धारकांना नोटीसा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here