मुख्यमंत्र्याच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटपाचा प्रकार ?

The type of distribution of money to teachers after the Chief Minister's meeting
The type of distribution of money to teachers after the Chief Minister's meeting

जळगाव

The type of distribution of money to teachers after the Chief Minister’s meeting? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी जळगाव येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर शिक्षक मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या एक्स माध्यमावर शेअर केला आहे.

in article

सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. शिवसेना पक्षाकडून आमदार किशोर दराडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराच्या सभा मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अहमदनगर नाशिक जळगाव या जिल्ह्यात घेण्यात आल्या. त्यांची जळगाव येथे सभा पार पडल्यानंतर उपस्थित शिक्षकांना दराडे यांचा कार्यकर्ता पैसे वाटताना दिसत आहे . तर शिक्षक आपले नाव यादीप्रमाणे पाहून पैसे घेताना दिसत आहेत.

यापूर्वी दराडे यांच्यावर या मतदार संघात शिक्षकांना पैठणी वाटप केल्याचा आरोप आहे. यंदाही उमेदवाराकडून पैसे साड्या आणि नथ वाटप करण्यात येत असल्याचे पण आरोप होत आहेत .याबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया शिवसेना उमेदवारांच्या वतीने अद्याप देण्यात आली नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here