शिरूर
तालुक्यातील टेंभुर्णीचे सरपंच तथा वामनभाऊ ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिथुन डोंगरे यांनी गावातील ज्येष्ठ दाम्पत्यांचा सन्मान करत महाराष्ट्रीयन संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे.गावातील पाच वयोवृद्ध जोडप्यांना बोलावून त्यांना नवीन कपडे आणि जेवण देवून त्यांनी हा आदर्श उपक्रम राबविला आहे.
टेंभुर्णी येथील जालिंदरनाथ माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आदर्श शिक्षक आर.जी.घुले हे तर प्रमुख पाहुणे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते सुरेश राजहंस,पी.आर.सिरसा,एल.एम.सिरसाट सर आणि सविताताई डोंगरे यांची उपस्थिती होती.
सरपंच मिथुन डोंगरे हे दरवर्षी दिवाळी निमित्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असतात.या वर्षी त्यांनी टेंभुर्णी येथील पाच वयोवृद्ध जोडप्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.या वयोवृद्ध जोडप्यांना पूर्ण पोशाख देण्यात आला.तसेच शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
सरपंच मिथुन डोंगरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद करताना सांगितले की,आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात बहुतांश घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक अडचण ठरत आहेत.मात्र आपली भारतीय संस्कृती ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा संदेश देते.मंगल प्रसंगी सर्वांना मोठ्यांचे आशिर्वाद हवे असतात.
मात्र घरात ते नको असतात.ही समाज मानसिकता कमी व्हावी, सर्वांनी वयोवृद्धांचा मान राखावा व त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ करावा याची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक आर.जी.घुले यांनी अध्यक्षीय समारोप करताना आपल्या मनोगतात सध्य स्थितीत अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगत या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी वैभव नागरगोजे,अर्जुन सिरसाट,बंडू रोकडे,भगवान सिरसाट, भिमराव कराड,शहदेव नाना,गणेश ढगे,ज्ञानदेव सिरसाट,अशोक सिरसाट,मारुती सिरसाट,बाबू सिरसाट, पांडुरंग सिरसाट,जगन्नाथ आव्हाड,भिमराव शिरसाट,रामजी
ढाकणे,शिवनाथ ढाकणे,आप्पासाहेब ढाकणे,रवि ढाकणे,नामदेव दादा यांच्यासह डोंगरे परिवारावर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमानंतर सर्वांच्या स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.