- Advertisement -
- Advertisement -
मुंबई
Sunetra pawar filled nomination for rajyasabha राज्यसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज विधानभवनमध्ये दाखल केला.
यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी नुकतीच बारामती लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. आता त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे.