Shriram rangoli in miraj विश्वविक्रमवीर रांगोळीकार आदमअली मुजावर यांनी मिरजेत रेखाटली श्रीरामाची रांगोळी
मिरज
Shriram rangoli in miraj विश्वविक्रमवीर रांगोळीकार आदमअली मुजावर यांनी मिरजेत shriram श्रीरामाची 100 फुटी रांगोळी रेखाटली आहे. सर्वधर्म समभावाचा प्रचार करणाऱ्या या अवलियाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, महावीर वर्धमान आणि अनेक महामानवांची रांगोळी रेखाटली आहे.
मिरज मधील श्री रामाची rama रांगोळीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. भाजपाचे मिरज विधानसभा प्रमुख मोहन वानखंडे सर आणि जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या पुढाकाराने भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे.
रांगोळीकार आदमअली मुजावर यांनी मिरज येथील आळतेकर हॉलमध्ये १०० फूट लांबीची आणि ६० फूट रुंदीची सुमारे सहा हजार चौरस फूट अशी भव्य रामाची व ayodhya राम मंदिराची रांगोळी काढली आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तीन दिवस परिश्रमपूर्वक ही रांगोळी काढली आहे. सर्वधर्म समभावाचा प्रचार या उद्देशाने आदम अली मुजावर यांनी यापूर्वीही अनेक महापुरुषांच्या रांगोळी काढली आहे.