लालपरीच्या पायरीचे शेवटचे दर्शन घेऊन वाहकाची सेवानिवृत्ती

- Advertisement -
- Advertisement -


शिरूर

Shirur news st प्रवाश्च्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेवुन सर्वसामान्य जनतेचा प्रवास सुखकर करणाऱ्या पाटोदा आगाराच्या पाटोदा-पाथर्डी बसवर कर्तव्यावर असलेल्या सखाराम सरवदे यांची सेवानिवृत्ती झाली आहे.

पाथर्डीला मुक्कामी बस घेवुन जाणाऱ्या सरवदे यांनी शिरूर शहरातील बस स्थानकात लालपरीच्या पायरीचे शेवटचे दर्शन घेऊन आपली सेवापूर्ती सन्मानाने पूर्ण केली आहे.

तालुक्यातील पाडळी येथील रहिवासी असलेल्या सखाराम सरवदे यांनी बत्तीस वर्ष विनातक्रार पाटोदा आगारात वाहक म्हणून सेवाकाल पूर्ण केला आहे.31 मे रोजी त्यांची नियमानुसार सेवा पूर्ण होत असून त्यांचा सेवापुर्ती सोहळा आगारात होणार आहे.

तत्पूर्वी कर्तव्यावर असल्यामुळे शहरातील बस स्थानकात त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी फेटा बांधून गळ्यात हार घालून सरवदे यांना छोटेखानी स्वरुपात निरोप देण्यात आला.सखाराम सरवदे यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे.त्यांचा एक मुलगा दुबई मध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे.

सरवदे यांनी आपल्या सेवेच्या कार्यकाळात प्रवासात असणाऱ्या एकाही प्रवाशाला प्रवासापासून वंचित ठेवले नाही.शिरूर बस स्थानकात आयोजित त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी वाहक राजेंद्र केदार,नवनाथ पानखडे,अशोक कातखडे,प्रमोद अंदुरे यांच्यासह सर्पमित्र महेश औसरमल,प्रताप कातखडे,प्रकाश भांडेकर,नितीन गाडेकर यांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles