बीड
Sarpanch santosh deshmukh murder case andolan सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत.
त्यांनी या प्रकरणी आज गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यात मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झालेत. या सर्वांनी तपास यंत्रणांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.
३१ डिसेंबर रोजी सीआयडी ने मोठा दावा केला होता. खंडणी आणि खून यांमध्ये कनेक्शन असल्याचा दावा जाहीर केला होता. मात्र आता काही आरोपींना मकोका आणि ३०२ गुन्ह्यात घेतलं जात नाही. हे चुकीच्या पद्धतीने होत आहे. गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
धनंजय देशमुख म्हणाले, माझ्या भाऊ खून प्रकरणाला ३३ दिवस लोटले आहे, मला हा प्रश्न वारंवार विचारला जात होता, म्हणजे हे प्रकरण झालं, जी हत्या झाली. त्या दिवशीपासून आणि मी पण तुम्हाला आत्तापर्यंत सांगत होतो की काम चालू आहे. व्यवस्थित चालू आहे.
पण परवा दिवशी रात्री वैभवी न एक व्हिडिओ टाकला होता. ते तुम्ही बघितला असेल की आम्हाला तपासाची माहिती द्या, काय झाले, कोण कोणत्या गोष्टी होत आहेत त्या आम्हाला माहिती होऊ द्या, कुटुंबाला होऊ द्या, गावकऱ्यांना होऊ द्या परंतु कुठल्याही प्रकारची माहिती आतापर्यंत दिली नाही.
काय चालू हे माहित नाही आणि त्यामुळेच मी निर्णय घेतला. जर न्याय मागताना आरोपी शोधत नाहीत, पकडलेले आरोपीवर सगळ्यांवर सारखे गुन्हे नोंद होत नाहीत तर मग आपण निर्णय घेतला पाहिजे, काही निर्णय घेतला नाही तर ते मलाही मारतील म्हणून स्वतः आपण पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर जाऊन आपल्याला आणि कुटुंबाला संपून घेणार आहे आणि मी गांभीर्यपुर्वक सांगत इशारा दिला आहे. त्यांच्यासमवेत ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.