santosh deshmukh बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आ.सुरेश अण्णा धस यांनी केली होती. या मागणीला यश आलं असून राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी उज्वलजी निकम आणि अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे देशमुख कुटुंबियांना मोठा धीर मिळाला असून संतोष देशमुख यांना लवकरच न्याय मिळेल. अन्यायाविरुद्धचा आपला हा लढा सुरूच राहणार आहे. आरोपींना लवकरच शिक्षा होईल.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख santosh dehsmukh murder यांच्या हत्त्या ला 70 दिवस उलटून गेले आहेत. परंतु या संदर्भात अजून तपास होत नसल्याचा आरोप संतोष देशमुख कुटुंबीय करत आहेत. याबाबतचा लढा आमदार सुरेश धस यांनी चालू ठेवला आहे.
याबाबत विधीद्न्य उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याने या प्रकरणाचा तपास santosh deshmukh case पुढे जाण्याच्या आशा निर्माण झाली आहे .