Sankashti Chaturthi

ताज्या बातम्या

निद्रिस्त गणेशाच्या यात्रेस प्रारंभ 

By admin

February 20, 2022

Sankashti Chaturthi आव्हाणे बुद्रुक येथील निद्रिस्त गणेशाच्या यात्रेस आजपासून प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या यात्रेला आज सुरुवात झाली.

दरवर्षी hindu calendar माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आव्हाणे येथे गणपती यात्रा उत्सव आयोजित केला जातो. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकट असल्याने हा यात्रा उत्सव बंद होता.

कोरोना चे नियम शिथिल झाल्याने पुन्हा उत्सवाला सुरुवात झाली आहे.

सकाळी पैठणहून आणलेल्या कावडीच्या पाण्याने गणेशाला अभिषेक घालण्यात आला.विधिवत पूजा करून गणेशाच्या यात्रेला सुरुवात झाली.

चतुर्थीचा chaturthi tithis उपवास असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी गणेशाच्या पालखीची मिरवणूक काढली जाणार आहे.

Sankashti Chaturthi ऐतिहासिक परंपरा

गेल्या अनेक वर्षापासून आव्हाणे गावात यात्रेची परंपरा आहे. सर्व धर्मीय नागरिक ही परंपरा जतन करत आहेत.गावातून गणेशाच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. यावेळी शोभेच्या दारूची आतिषबाजी केली जाते.

पौराणिक महत्व

राज्यातील निद्रिस्त अवस्थेत असलेला हा एकमेव गणेश म्हणून ओळखला जातो. या गणपतीची मूर्ती झोपलेल्या स्थितीत असल्याने त्यास निद्रिस्त गणेश म्हटले जाते.

हा गणपती शेतात नांगरणी करत असताना सापडला असल्याची आख्यायिका आहे. या निद्रिस्त गणेशाच्या मूर्ती साठी पुरातन मंदिर बांधण्यात आले. हे संपूर्ण मंदिर वीट आणि जांभ्या दगडात बांधण्यात आले आहे.

या मंदिराचे व्यवस्थापन ट्रस्ट कडे असल्याने आता येथे सुधारणा करण्यात आल्या आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्ट ने दर्शन रंग आणि सभामंडप उभारला आहे.

sankashti chaturthi is observed यात्रा निमित्ताने पंचक्रोशीतील नागरिक, महिला भाविक दर्शनासाठी worship lord ganesha येत असतात. सुट्टीच्या दिवशी यात्रा असल्याने आणि दोन वर्षानंतर यात्रा होत असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.

नागरिकांनी कोरोना नियम पाळून दर्शन घेण्याचे आवाहन गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी आणि सचिव अर्जुन सरपते यांनी केले आहे.