अहिल्यानगर
saffron plant farming in ahilyanagar (ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी शहरातील चिंचकर दाम्पत्याने राहत्या घरातील एका खोलीत काश्मीर येथील केशर शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. नीलिमा चिंचकर आणि रामदास चिंचकर असे या प्रयोगशील दाम्पत्याचे नाव आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर चिंचकर दांपत्याने केशर शेतीचा प्रयोग राहुरी सारख्या शहरात यशस्वी करून दाखविला आहे.
चिंचकर दाम्पत्याला केशर शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळू लागल्याने एका नव्या प्रयोगाला उभारी मिळाली आहे. मागील काही वर्षांपासून अनियंत्रित हवामान आणि बदलते वातावरण यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हीच शेती जर नियंत्रित वातावरणात केली तर होणारे नुकसान टाळता येते, असा विचार करून चिंचकर दाम्पत्याने केशर शेती करण्याचा निर्णय घेतला.
saffron plant in ahmednagar
त्यासाठी आवश्यक असणारे केशराचे कंद त्यांनी पेट, काश्मीर येथून मागवले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी घरातच काश्मीरसारखे वातावरण त्यांनी राहत्या घराच्या एका बंद खोलीत तयार केले. आर्द्रता आणि नियंत्रित तापमान यांच्या आधारावर अगदी दोनच महिन्यात त्यांच्या केशराला फुले आली आहेत. 11 फूट बाय 15 फुटाच्या एका बंद खोलीत केशर पिकविण्याची किमया साध्य करून दाखवली आहे.
त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. किरकोळ बाजारात एक ग्रॅम केशरची किंमत 800 ते 1000 रुपये इतकी आहे. मागणी जास्त आणि उत्पादन कमी, यामुळे केशरला चांगला भाव मिळत आहे. काश्मीर येथील मोगरा केसर हे जगातील सर्वोत्तम केसर समजले जाते.
भारताच्या केशराच्या मागणीपैकी फक्त आठ ते दहा टक्के मागणी आपण पूर्ण करू शकतो. बाकी केशर इराण आणि स्पेन या देशातूनआयात केले जाते.
kesar farming in ahilyanagar ahmednagar
एरोपोनिक्स तंत्रज्ञानासाठी रूम बनवण्याचा खर्च हा एकदाच करावा लागतो. काश्मीरहून जे कंद मागवले जातात, त्या एका कंदाचे पुढच्या वर्षी चार कंद तयार होतात. असे दरवर्षी कंद वाढत जातात. कंद वाढले की उत्पन्नातही वाढ होते. कंदाला वर्षातून एकदा फुले येतात. त्या फुलांवर ते केशर येते. नंतर ते काढून एकत्रित केले जाते.
उत्पन्न अत्यंत कमी निघाले, तरी त्यांची किंमत बाजारात जास्त असते. या केशरला ‘लाल सोने’ असे देखील संबोधले जाते. केशराच्या अधिक किंमतीमुळेच त्याचा ‘लाल सोने’ असा उल्लेख केला जातो. खाद्य पदार्थांसह केशराचा सौंदर्यप्रसाधने आणि औषधांमध्येही वापर केला जातो.
भारतात केशरला भरपूर मागणी आहे. त्या तुलनेत उत्पादन खूप कमी आहे. त्यामुळे इराणसह अन्य देशांकडून ते आयात केले जाते. मागणी जास्त असली तरी उत्पादन मात्र कमी असते. कारण केशर पिकविण्याचे भारतातले एकमेव ठिकाण म्हणजे काश्मीर. परंतु, हवामान बदलामुळे वीस वर्षात केशरच पीक 60 टक्क्यांनी कमी झाले आहे. केशराचे पीक हे काश्मीरमध्ये काही भागामध्ये घेतले जाते. साठी योग्य तापमान आणि आर्द्रतेची आवश्यकता असते. वातावरणातील हवामान बदलामुळे आता काश्मीरमध्ये केशराचे उत्पादन कमी होत आहे.
वातावरण नियंत्रित करून आपण कोणत्याही भागातले पीक भारताच्या कोणत्याही ठिकाणी घेऊ शकतो. केशर शेती हे त्यापैकीच एक. या तंत्रज्ञानाला एरोपोनिक्स तंत्रज्ञान असं म्हणतात. म्हणून आता केशर शेती ही फक्त काश्मीरपुरती मर्यादित राहिली नसून राहुरीत देखील या केशर शेतीचा यशस्वी प्रयोग सुरू झाला आहे.
नीलिमा चिंचकर म्हणाल्या, आम्हाला शेतीची खुप आवड आहे. आम्ही घरातच केशर शेतीचा शेतीचा प्रयोग करण्याचे ठरविले. आम्ही काश्मीरच्या केशर उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. जून 2024 मध्ये 300 किलो केशर कंद मागविले. एकूण सहा लाखांचा खर्च झाला. 250 ग्रॅम केशरचे उत्पन्न मिळाले. 800 ते 1000 रुपये ग्रॅमप्रमाणे केशर विक्री सुरू आहे. यातून पहिल्या वर्षी दोन लाखांचे उत्पन्न मिळेल. मात्र पुढील वर्षी चौपट उत्पन्न अपेक्षित आहे.