शिर्डी
Rashmika mandanna at saibaba Shirdi रश्मिका मंदान्ना आणि विकी कौशिक साईंच्या दर्शनासाठी एकत्र शिर्डीला पोहोचले.
आगामी छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रश्मिका मंदान्ना आणि विकी कौशिक यांनी आज साई शिर्डी येथे हजेरी लावली.
पुष्पा या चित्रपटात रश्मिकाचा उत्तम अभिनय पाहायला मिळाला. रश्मिका मंदान्ना मंदिरात आली तेव्हा तिच्यासोबत विकी कौशिक दिसला. रश्मिका मंदान्ना पायाभोवती पट्टी बांधलेली दिसली. दोघेही विक्की कौशिकचा हात धरून साई मंदिरापर्यंत एकत्र फिरताना दिसले.
विकी कौशिकचा आधार घेत आणि तिचा हात धरून रश्मिका साई समाधी मंदिरात गेली. यावेळी भक्ताला रश्मिका आणि विकी कौशिक आहे हे समजताच त्यांनी छावा असा जल्लोष करत रश्मिकाला पाठिंबा दिला. यावेळी लोकांची गर्दी दिसून आली.
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ एकटीच शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आली होती, तेव्हा विकी कौशिक तिच्यासोबत नव्हता, मात्र आज विकी कौशिक रश्मिकासोबत दिसला.
सध्या छावा या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन साठी विकी कौशिक आणि रश्मिका मंदाना हे दोघं वेगवेगळ्या प्रसिद्ध मंदिराच्या दर्शनासाठी दिसत आहेत. काही दिवसांपर्वी त्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिली होती.
विकी कौशिक यांनी यापूर्वी छत्रपती संभाजी नगर मध्ये येऊन मोठा रोड शो केला होता. त्यांच्या छावा चित्रपटातील एका दृश्यबाबत आणि नृत्याबाबत वाद निर्माण झाला होता.