केळी रूम्हणवाडी येथील पोपट वळू ठरला चॅम्पियन

- Advertisement -
- Advertisement -


राजूर

rajur dangi pashu pradarshan अकोले तालुक्यातील राजूर येथे आयोजित करण्यात आलेल्या देशी- विदेशी व डांगी जनावरांच्या प्रदर्शनात अकोले तालुक्यातील केळी रूम्हणवाडी येथील धोंडिबा किसन बिन्नर यांचा वळू चॅम्पियन ठरला. इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील भाऊसाहेब राजाराम घोटे यांचा वळू उपविजेता ठरला.


राजूर ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेचा पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथील खंडोबा मंदिराच्या टेकडीवर डांगी जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी आ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे हे उपस्थित होते.

प्रदर्शनासाठी नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील तालुक्यांतील डांगी तसेच देशी-विदेशी जनावरे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली आहेत.

जनावरे खरेदीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने दाखल झाला आहे. यावेळी सरपंच पुष्पा निगळे,उपसरपंच संतोष बनसोडे गोकुळ कानकाटे,अतुल पवार, सारिका वालझाडे, संगीता मैड, हर्षल मुतडक, प्रमोद देशमुख, रोहिणी देशमुख, सुप्रिया डगळे, संगीता जाधव, ओंकार नवाळी, रोहिणी माळवे, विमल भांगरे, राम बांगर, लता सोनवणे, संगीता मोहंडुळे, अरुणशेठ माळवे,दत्तात्रय निगळे,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे,ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.

जनावरांसाठी यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील ९८ शेतकऱ्यांनी आपली डांगी जनावरे रिंगणात उतरवली होती.


वळूमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विविध प्रकारच्या वळु च्या शेतकऱ्यांची नावे आदत -मधुकर कारभारी ढोंन्नर (समशेरपुर ता. अकोले), दोन दाती – संजय बळवंत गाढवे (धामणगाव ता.इगतपुरी )चार दाती – धोंडिबा किसन बिन्नर (केळी रुम्हाणवाडी ता.अकोले), सहा दाती – भाऊसाहेब राजाराम घोटे (धामणी ता. इगतपुरी ) तर आठ प्रकारात भाऊसाहेब कचरू भोसले (धामणी ता.इगतपुरी ) याबरोबरच इतर प्रकारांतही डांगे जनावरांची निवड करण्यात आली.

“कर न आकारण्याचा ऐतिहासिक निर्णय- राजूरच्या डांगी व संकरित जनावरांची प्रदर्शनामध्ये खरेदी-विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी मोफत सोयी-सुविधा उपलब्ध करून देत कर आकारणी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles