विहिरीत पडलेल्या दोन दुर्मिळ महाकाय अजगर सर्पराज्ञीत उपचार!
.
शिरूर कासार,
Python treatment in shirur आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील जगन्नाथ किसन महाजन यांच्या विहिरीत पडलेल्या दोन जखमी अजगरांना शिरूर कासार येथील सर्पमित्र महेश औसरमल यांनी विहिरीत उतरून पकडले. या जखमी अजगरांना पुढील उपचारासाठी तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले. सध्या या अजगरांवर सर्पराज्ञीत उपचार सुरू आहेत.
दुर्मिळ आणि संकटग्रस्त असलेले दोन महाकाय अजगर वंजारवाडी ता. आष्टी येथील किसन जगन्नाथ महाजन यांच्या शेतामध्ये असलेल्या पाच परस विहिरीत काही दिवसापूर्वी पडले होते. या अजगरांची माहिती संकेत ढाकणे व रवी ढाकणे यांनी शिरूर कासार येथील सर्पमित्र महेश औसरमल यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र महेश औसरमल व त्यांचे सहकारी मित्र साजिद शेख व शुभम चोरडिया यांनी घटनास्थळी जाऊन त्या अजगरांना पकडले. नंतर हे दोन्हीही अजगर जखमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब पुढील उपचारासाठी या दोन्हीही जखमी अजगरांना तागडगाव जिल्हा बीड येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले. या दोन्हीही अजरावर सध्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू आहेत. अजगरांच्या तब्येतीत सुधारणा होत असून लवकरच विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना त्यांच्यामूळ नैसर्गिक अधिवासात सोडून देणार असल्याची माहिती सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे यांनी दिली .
[…] […]