pm modi nashik rally देशासह राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव येथे सभा पार पडली.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू श्री रामचंद्रांना नमन करतो. काल वाराणसीमध्ये मी बाबा विश्वनाथ, काळ भैरवाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर आज त्र्यंबकेश्वरच्या आणि भगवान काळारामाच्या भूमीवर आहे. त्यामुळे मी सर्वांना प्रणाम करतो. लोकांची सेवा हेच माझ्या जीवनाचे लक्ष. तुम्ही मागील १० वर्षांत माझे काम बघितले असेल त्यानंतर आजी मी तुमच्याकडे विकसित भारत बनविण्यासाठी आशीर्वाद मागायला आलो आहे, असे मोदींनी म्हटले.
पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, ‘एनडीएला मोठा विजय मिळणार असून हे कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. इंडिया आघाडीतील मुख्य पक्ष असणारा कॉंग्रेस पक्ष यंदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत होत असून त्यांच्यासाठी विरोधी पक्ष बनणे देखील मुश्कील आहे. इंडिया आघाडीचे जे नेते आहेत त्यांनी संपूर्ण छोट्या पक्षांना सूचना केली आहे की निवडणूक संपल्यानंतर कॉंग्रेसमध्ये विलीन व्हायला पहिजे, त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर हे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे मोदींनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये नकली शिवसेना आणि नकल राष्टवादी यांचे विलीन होणे निश्चित आहे. मात्र, यामध्ये ज्यावेळी नकली शिवसेना विलीन होईल त्यावेळी मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरेंची येईल. बाळासाहेब म्हणाले होते की, ज्यावेळी शिवसेना कॉंग्रेसची होईल त्यावेळी शिवसेना बंद करून टाकेल. मात्र, आता त्यांच्या याच स्वप्नांचा नकली शिवसेनेने चुराडा केला आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते की अयोध्येत राममंदिर व्हावे, जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवावे त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंरतु, याची सर्वात जास्त चीड ही नकली शिवसेनेला येत आहे. आम्ही दिलेले राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नकली शिवसेनेसह कॉंग्रेसने नाकारले. मात्र, आता राममंदिर उभे राहिले तरी कॉंग्रेस राममंदिराबाबत वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, त्याच कॉंग्रेसला उरावर घेऊन नकली शिवसेना नाचत आहे. जी कॉंग्रेस सावरकर यांच्याविरोधात बोलते त्या कॉंग्रेससोबत नकली शिवसेना असून त्यांनी कॉंग्रेससमोर गुडघे टेकले आहेत, असेही मोदींनी म्हटले.
तसेच पहिल्या चार टप्प्यातील निवडणुकांमध्ये नकली शिवसेना चारी मुंड्या चीत झाली आहे. आज मोदी सरकार गरिबांना मोफत धान्य आणि पक्के घरे देत आहेत. गरीब कुटुंबाना उज्ज्वला गस देत आहे. हे देताना आम्ही कधीही कोणाचा धर्म आणि जात पहिली नाही. माझ पूर्ण जीवन गरीब, शेतकरी आणि महिलांच्या विकासासाठी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला होता. पंरतु, आता कॉंग्रेसला एसी, एसटी आणि गरिबांचे आरक्षण घेऊन मुस्लिमांना द्यायचे आहे. मात्र जो पर्यंत मोदी वंचितांचा चौकीदार आहे त्यांचे आरक्षण कोणीही हिरावू शकत नाही, असेही मोदी म्हणाले.
[…] […]