परळी तालुक्यात पीक विमा योजनेत 22 कोटी रुपयांचा घोटाळा ?
आ.सुरेश धस यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार
आष्टी (प्रतिनिधी )
pik vima fraud beed parli बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी शासनाच्या काळामध्ये सन 2020 व सन 2023 या कालावधीमध्ये पीक विमा योजनेत 22.00 कोटी रू.भ्रष्टाचाराचा घोटाळा झाला असून या संपूर्ण भ्रष्टाचाराची माहिती आ. सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिली असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
या बाबत ची अधिक माहिती अशी की,बीड जिल्ह्यातील परळी या एकाच तालुक्यात अंदाजे 7 हजार हेक्टरचा पीक विमा घोटाळा झाला असून एकाच तालुक्यात 22.00 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली.
crop insurance fraud parli beed
परंतु ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांना मिळालीच नाही.कारण मूळ मालक यांचे नावे जमीन असून एक रू. विमा रक्कम इतरांचे नावे भरून नुकसानभरपाई रक्कम त्यांनीच उचलली आहे हे देखील समोर आले असून हा महा घोटाळा सीएससी (CSC) सेंटर चालक व राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांच्या नावे पीक विमा भरले गेले आहेत अशी माहिती मिळत असल्याचे सांगत आ.सुरेश धस यांनी जमीन शेतकऱ्याची मात्र विमा भरताना पक्षाचे पदाधिकारी यामुळे बीड जिल्ह्यात 22 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची माहिती मिळत असल्याचे सांगितले आहे.
या बाबती आ. सुरेश धस म्हणाले की, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या काळात एक रुपयात पिक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी आणली व लोकप्रिय झाली मात्र त्याचा गैरवापर काही पक्षाचे कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत त्यामुळे याची सखोल चौकशी करून या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.