मुबई
pankaja munde on mumbai marathi भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांनाही मुंबईत घर नाकारल्याचा गौप्यस्फोट त्यांनी आपल्या एका व्हिडीओ द्वारे केला आहे .
मुंबईमध्ये मराठी माणसांना घर नाकारण्यात आल्याची घटना दोन दिवसापासून ऐरणीवर आली आहे. एका मराठी तरुण मुलीला घर मुलुंड मध्ये घर नाकारण्यात आल्याच्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यातच भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस असलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही आपला मुंबईमध्ये घर घेण्याचा वेळी आलेला अनुभव आपल्या यूट्यूब चैनल वर शेअर केला आहे. त्यामुळे मराठी माणसाला मुंबईमध्ये घर नाकारत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दस्तूरखुद्द भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना हा अनुभव आल्यामुळे आणि त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा जोर धरत आहे.
आपल्या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मराठी तरुणीची व्यथा मी पाहिली, खरे तर भाषा आणि प्रांतवाद यामध्ये मला पडणे आवडत नाही. आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात जातीयवाद भाषावाद किंवा प्रांतवाद केला नाही. कुणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणी काय करावं ,याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मराठी माणसांना मुंबईमध्ये घर न मिळणे किंवा मराठी माणसांना सोसायटीत राहण्याची परवानगी न देणे हे अत्यंत धक्कादायक अस्वस्थ करणारे आहे असेही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले.
आपल्या व्यथा व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की,”आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. वेगवेगळ्या नागरिक आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहे.प्रत्येक रंगामध्ये माणूस वाटला गेला आहे. यात हिरवा,पिवळा, भगवा आणि निळा ही सर्वच रंग आहे हे जर सर्व रंग जोरात फिरवले तर पांढरा रंग तयार होईल आणि हा रंग शांततेचा असेल असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.