आष्टी
pankaja munde dasara melawa मी आता 2024 ला मैदानात आहे,मी पाडण्यासाठी मैदानात असणार आहे.माझा आवाज आता कोणी दाबू शकणार नाही.प्रसंगी वेळ आली तर मलाही दुसऱ्या मतदारसंघात जावे लागेल याचे सुतोवाच करत आपण कायम पक्षाबरोबरच राहणार असल्याची ठाम भूमिका भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली.
भाजप नेते पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा dasara festival आज बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पार पडला.संत भगवान बाबा यांच्याजन्मस्थळी जन्मस्थळी गेल्या काही वर्षापासून दसरा मेळावा साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे भाषण हे येथील उपस्थितांचे खास आकर्षण असते.
मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषेदत मोठी घोषणा!
यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर प्रीतम यांचा, खासदार डॉक्टर सुजय विखे,विधान परिषदेचे सदस्य सुरेश धस,आमदार मोनिका राजळे,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,आमदार नमिता मुंदडा, यशश्री मुंडे,सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार गोल्हार माजी आमदार भीमरावजी धोंडे यांच्यासहअनेक मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याला भगवान बाबा भक्त तसेच पंकजा मुंडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात.
आज या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती हजारोच्या संख्येने भाविक याा ठिकाणी पंकजा मुंडे यांना ऐकण्यासाठी आले होते.
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना साथ घालत मी राजकारण करावे का सोडून द्यावे? असा सवाल केला. उपस्थित नागरिकांना शिवशक्ती परिक्रमामध्ये लोकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसे भव्य ते दिव्य असे माझे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी ची नोटीस आली. यावेळी नागरिकांनी माझ्यावर प्रेम करत दोन दिवसात अकरा कोटी जमवले ,मात्र हा पैसा आपण घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.लोकांनी माझ्यासाठी खूप केलं मात्र मी समाजाला सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसी समाजाच्या अपेक्षा आहेत, तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आता समाजाची शक्ती संपली आहे त्यामुळे आता समाजाचे प्रश्न न सोडवणाऱ्यांना आपण 2024 मध्ये पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी नैतिकतेचे राजकारण करणार असून जिंकण्यासाठी नैतिकता गहाण ठेवून शकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच उपेक्षितांना न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नसल्याचे ही पंकजा मुंडे pankja munde यांनी सांगितले.