शक्तीपीठ महामार्गास विरोध ; शेतकऱ्यांची तीव्र निदर्शने

- Advertisement -
- Advertisement -

परळी / प्रतिनिधी

Opposition to Shaktipeeth Highway; Violent protests by farmers पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ महामार्ग मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून जात असून या महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार असल्याने या प्रस्तावित महामार्गाविरोधात परळी अंबाजोगाई तालुक्यातील बाधित शेतकरी एकजूट होत अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग हा प्रस्तावित असून हा मार्ग अत्यन्त सुपीक आणि बागायती जमिनीतून जाणार आहे. त्यामुळे मराठवड्यातील खूप मोठी बागायत जमीन या महामार्गामध्ये जाऊन कायमस्वरूपी शेतकरी भूमिहीन होणार आहेत.यामुळे पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ महामार्गास शेतकरी विरोध करत आहेत.याच अनुषंगाने 13 एप्रिल 2024 रोजी परळी येथे मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांची विभागीय बैठक संपन्न झाली होती.

या महामार्गास विरोध दर्शविण्यासाठी मंगळवार दि 18 रोजी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील बाधित असंख्य शेतकरी एकत्र येत अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयावर धरणव निदर्शने करत शक्ती पीठ महामार्ग रद्द करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.या प्रसंगी अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऍड शिंदे तसेच परळी, अंबाजोगाई तालुक्यातील महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles