महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं साजरा होणार ऑलिम्पिक दिन!

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई:

Olympic Day will be celebrated on behalf of Maharashtra Olympic Association! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचलनालयाच्या वतीनं उद्या रविवारी दिनांक २३ जून २०२४ ला जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे. शासनाच्या वतीनं सर्व जिल्ह्यांना ऑलिम्पिक दिन साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात मुंबईत भारतीय क्रीडा मंदिर वडाळा, छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुल, नागपूरात विभागीय क्रीडा संकुल, लातुरमध्ये धाराशीव, नाशिकमध्ये विभागीय क्रीडा संकुल आणि अमरावतीत हनुमान प्रसारक मंडळ इथं ऑलिम्पिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

पुण्यात या सोहळ्याला सकाळी ७.३० वाजता क्रीडा रॅलीनं सुरुवात होणार आहे. लाल महाल इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात होईल. रॅलीमध्ये सर्व ऑलिम्पियन, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि मान्यवर सहभागी होणार असून शिवाजी रस्ता मार्गे लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज, टिळक रस्त्याने स.प. महाविद्यालयात रॅलीची सांगता होईल. त्यानंतर सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम स.प. महाविद्यालयातच पार पडणार आहे. या वेळी सर्व खेळाडू आणि पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, योगासन, मल्लखांब, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात येईल. त्यानंतर सर्व उपस्थित आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. 

ऑलिम्पिक दिनाचाच भाग म्हणून सकाळी ७.३० वाजता म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुल इथं ३ आणि ५ किलो मीटर धावण्याची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. याच दरम्यान सकाळ ८:०० वाजता डेक्कन जिमखाना ते म्हात्रे पूल डी. पी. रोड अशा आणखी एका मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं आहे. यासह पिंपरी इथल्या हॉकी मैदानात सायंकाळी ५:०० वाजता हॉकी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles