राष्ट्रीय महामार्ग अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा

Nhai Ahmednapur to Ahmednagar
Nhai Ahmednapur to Ahmednagar



बीड

Nhai Ahmednapur to Ahmednagar बीड जिल्ह्यातुन जाणारे राष्ट्रीय महामार्ग वाहनचालकांच्या मृत्युचे सापळे बनले असुन अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते धायगुडा पिंपळा दरम्यान येळंब घाट याठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी भेगा पडल्या असुन दुचाकी वाहनांचे चाक फसुन अपघातांचे प्रमाण वाढले आहे यात अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

in article

रस्त्यावरील खड्डे ,तडे आणि भेगा  अपघातास निमंत्रण देत आहे . संबंधित काम एचपीएम इन्फ्रा एल एल पी कंपनीकडून करण्यात आले असुन सततच्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असुन जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे.

पडलेल्या भेगांची थातुरमातुर दुरुस्ती न करता ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आणि जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

संबंधित प्रकरणात जबाबदार कंत्राटदार व प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यकारी अभियंता मुंबई यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

८९७ कोटीचा निधी तरीही अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग दर्जाहीन आणि रखडलेला

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी या मार्गाचे काम कालावधी पूर्ण होऊनही गेल्या ६ वर्षांपासून अद्याप रखडलेल्या अवस्थेत आहे. एकुण १७० किलोमीटर लांबी असलेल्या महामार्गाची एकुण किंमत ८७९ कोटी रुपये आहे.राष्टीय महामार्ग विभागाने ठेकेदारांच्या हितासाठी सदर रस्त्याचे तीन टप्पे करून तिन वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिलेले आहे.

अर्धवट रस्ता, खड्डे आणि पुर्ण झालेल्या कामाच्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत.चुंबळी फाटा ते मांजरसुंभा १६६ कोटी रूपयांचे काम (एचसीपीएल) ; मांजरसुंभा ते धायगुडा पिंपळा ३९५ कोटी रूपयांचे काम (एचपीएम इन्फ्रा एल एल पी कंपनी) आणि धायगुडा पिंपळा ते अहमदपूर ३१८ कोटी रूपयांचे काम ( सत्यसाईबाबा कंपनी लातुर) यांच्या मार्फत करण्यात येत आहे. बहुतांश कामे अंदाजपत्रकाला फाटा देऊन संथगतीने कामे केल्याने रखडलेल्या अवस्थेत आहेत.

कामे पूर्ण होण्यापूर्वीच जागोजागी रस्ते उखडले आहेत, खड्डे,भेगा पडलेल्या आहेत.आणि  दुरुस्तीची कामे थातुरमातुर करण्यात येत असुन पडलेल्या भेगा डांबर टाकून बुजवण्याचे प्रकार करण्यात येत आहेत. कंत्राटदार यांच्यावर राष्ट्रीय महाप्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन मेहेरबान असल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

दुभाजक, पथदिवे,नाल्यांची कामे अर्धवट ; दिशादर्शक फलक नाही एचपीएम कंपनीचा अनागोंदी कारभार

महामार्गाचे काम सुरू होऊन ६ वर्षांपेक्षा कालावधी लोटला असुन अद्याप काही ठिकाणी दोन रस्त्यांमधील दुभाजक,अपुर्णच आहे काही ठिकाणी पुलांचे तर बहुतांश ठिकाणी नाल्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत तसेच सुरू कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक,बरीकेट्स लावण्यात आलेली नाहीत त्यामुळे अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे त्यामुळे कासवगतीने चालणारे काम एचपीएम कंपनीने तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मांजरसुंभा ते अंबेजोगाई राष्ट्रीय महामार्गावर कागदोपत्रीच वृक्षलागवड

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण करताना ४०-५० वर्षापुर्वीची वड,पिंपळ, कडुनिंब या वटवृक्षाची कत्तल करण्यात आली. नियमानुसार तोडण्यात आलेल्या वृक्षाच्या ५ पट झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावणे बंधनकारक असताना मांजरसुंभा ते अंबेजोगाई दरम्यान एचपीएम कंपनीने सुरूवातीला काही ठिकाणी वृक्षलागवड केल्याचे नाटक फोटो सेशन करण्यापुरतेच केले परंतु त्याचे संगोपन करण्यात आले नसुन सध्या एकही झाड अस्तित्वात दिसत नाही.

मात्र वृक्षलागवड, वृक्ष संगोपन आणि उन्हाळ्यात टँकरने पाणी दिल्याची बिले मात्र नियमित उचलण्यात आल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे याठिकाणी वृक्षांची लागवड आणि संगोपण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here