कडा,
National voters day celebration at kada beed राष्ट्रीय मतदार दिन बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आष्टी तहसील कार्यालय, कडा ग्रामपंचायत आणि कडा गावातील विविध माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला.
यानिमित्ताने गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी अभिवादन करून रॅलीस प्रारंभ केला. त्यानंतर ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ग्रामपंचायत येथे आली.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीची शपथ घेतली तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातामध्ये मतदार जनजागृती चे फलक झळकावले.
या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात मोतीलाल कोठारी विद्यालय, श्रीराम विद्यालय, भगिनी निवेदिता विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी आष्टी च्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच लताबाई भिमराव पाटील, उपसरपंच दीपक कर्डिले, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, मंडल अधिकारी औंधकर, कृष्णा जाधव, परसराम हंबर्डे,संदीप चव्हाण,शैलेश खाडे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.