शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझी उमेदवारी

- Advertisement -
- Advertisement -

नगर

Nashik Teacher Constituency Election Candidate नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर धुळे येथील एडवोकेट महेंद्र भावसार यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.यासंदर्भात आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्याशी बोलणे सुरू असूनलवकरच पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एडवोकेट महेंद्र भावसार यांनी पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या उमेदवारी मागील भूमिका स्पष्ट केली.

शिक्षकांची विविध प्रश्नांची विधिमंडळात मध्ये मांडणी करण्यासाठी या शिक्षक मतदार संघाची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये संस्थाचालक आणि राजकारणी व्यक्ती यांची घुसखोरी झाल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.यासाठी शिक्षक आमदारांना कायद्याची सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.


आपण गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात न्यायालयीन पातळीवर लढा देत असूनअनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे आपण या मतदारसंघात उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्याकडेही आपण उमेदवारीची मागणी केली असून सध्या बोलणी सुरू असल्याची त्यांनी सांगितले.


त्यांनी आपल्या नगर दौऱ्यात त्यांनी नगर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप,नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सर यांची संगमनेर यांची भेट घेतली.त्यांच्या समवेत चर्मकार महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय  खामकर , पत्रकार दिलीप साळुंखे  उपस्थित होते.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles