Nanded alegaon accident tractor fell into well update नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे झालेल्या अपघात प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची केली मदतीची घोषणा
नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या.
मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला
त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. ३ महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत.
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.